मुंबई - 'दंगल गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झायरा वसीमने आपले ट्विटर अकाऊंट बंद केले होते, ते तिने आता पूर्वत सुरू केले आहे. या माजी अभिनेत्रीने तिच्या ट्विटर हँडलवर टोळ हल्ल्याविषयी एक ट्विट केले होते, ज्यात तिने त्यामागचे कारण अल्लाहचा कहर असल्याचे म्हटले होते.
-
Because I’m just a human, like everyone else, who’s allowed to take a break from everything whenever the noise inside my head or around me reaches it’s peak :) pic.twitter.com/BMar06jIXl
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) May 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Because I’m just a human, like everyone else, who’s allowed to take a break from everything whenever the noise inside my head or around me reaches it’s peak :) pic.twitter.com/BMar06jIXl
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) May 30, 2020Because I’m just a human, like everyone else, who’s allowed to take a break from everything whenever the noise inside my head or around me reaches it’s peak :) pic.twitter.com/BMar06jIXl
— Zaira Wasim (@ZairaWasimmm) May 30, 2020
झायराच्या त्या ट्विटनंतर तिच्यावर ट्रोलर्सनी भरपूर टीका केली होती. त्यानंतर तिने आपले ट्विटर अकाऊंट बंद करणे पसंत केले होते. आता तिने पूर्ववत ट्विटर वापरायला सुरू केले आहे. ती परत ट्विटर वापरायला लागली असली तरी ती निष्क्रिय का झाली होती, असा प्रश्न तिला यूझर्स विचारत आहेत.
याला उत्तर देताना तिने म्हटलंय, की मीही एक माणूस आहे. मला गरज वाटते तेव्हा ब्रेक घेण्याची परवानगी आहे.
झायरा 'द स्काई इज पिंक' या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरसमवेत शेवटची झळकली होती. परंतु चित्रपट रिलीज होण्यापूर्वी धर्माचे पालन करण्यात अडचण असल्याचे सांगून त्यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता.