मुंबई - अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा कपूर अनेकदा आपल्या मुलांसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत असतात. अशात आता रक्षाबंधनच्या दिवशी झैन आणि मीशाचा राखी बांधतानाचा फोटो समोर आला आहे. जो यूजर्सची मनं जिंकणारा आहे.
मीराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान शाहिद आणि मीराने २०१५ साली ७ जुलैला लग्नगाठ बांधली. २०१६ मध्ये मीराने मीशाला जन्म दिला तर २०१८ मध्ये त्यांच्या घरी झैनचं आगमन झालं. शाहिद अनेकदा मीशासोबतचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या बाप-लेकीच्या नात्याची जवळीकता शाहिदच्या कॅप्शनमधून स्पष्टपणे जाणवताना दिसते. चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास शाहिद कपूर नुकताच 'कबीर सिंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळालं.