मुंबई - म्युझिक इंडस्ट्रीला वेड लावणारा प्रसिद्ध रॅपर आणि पंजाबी गायक यो यो हनी सिंग आज (15 मार्च) त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. देशातील प्रत्येक बालक हनी सिंगला त्याच्या स्टाईलने आणि 'यो यो' स्वॅगने ओळखतो. हनी सिंग जितका लोकप्रिय झाला, तितकाच तो वादग्रस्तही झाला. यशासोबतच हनी सिंगला कोर्टाच्या फेऱ्याही माराव्या लागल्या. हनी सिंग कधी त्याच्या गाण्यांमुळे तर कधी कौटुंबिक वादांमुळे प्रसिद्धीच्या झोतात यायचा. आम्ही हनी सिंगच्या त्या 5 मोठ्या वादांबद्दल बोलणार आहोत, ज्याने या टॉप स्टारच्या करिअरची वाट लागण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
१) शाहरुख खानने मारली होती थप्पड

शाहरुख खान आणि यो यो हनी सिंग या जोडीने 'लुंगी डान्स' सारखे ब्लॉकबस्टर गाणे दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'हॅप्पी न्यू इयर' (2015) चित्रपटादरम्यान कार्यक्रमात न आल्याने शाहरुखने त्याला थप्पड मारली होती, परंतु हनी सिंगने या बातमीचे खंडन केले आणि म्हटले की, ''शाहरुख ही अशी व्यक्ती आहे ज्याने माझ्य़ा वाईट काळात साथ दिली होती.''
२) बादशाहसोबतही झाले होते भांडण

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि हनी सिंग यांच्या हिट गाण्यांची यादी खूप मोठी आहे, पण दोघांच्या दोस्तीला नजर लागली. खरेतर हनी सिंगने बादशाहला नॅनो कार म्हटले होते. दोघेही जेव्हा मित्राच्या लग्नात एकत्र भेटले होते तेव्हा दोघांमद्ध्ये शारिरीक फाईट झाली होती. त्यानंतर दोघांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही.
३ ) गाण्यामुळे पुन्हा अडकला वादात

2018 मध्ये हनी सिंगने प्रदीर्घ काळानंतर पुन्हा नशीब आजमावले, मात्र हनी सिंग आणि वाद यांचे जुने नाते होते. झालं असं की, 2018 मद्ये हनी सिंगने 'मखना' हे गाणे बनवले होते. हनीच्या या गाण्याने चांगलीच खळबळ उडवून दिली होती, मात्र त्याचवेळी पंजाब राज्य महिला आयोगाच्या प्रमुख मनीषा गुलाटी यांनी त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. 'मखना' गाण्यातील 'मैं हूं वुमनशीअर' या शब्दावर मनीषाने आक्षेप घेतला होता.
४) हनी सिंग विरोधात मुलींचे आंदोलन

वर्ष 2013 मध्ये हनी सिंगने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या गाण्यांनी धुमाकूळ घातला. 2013 मध्ये रिलीज झालेल्या 'मैं हूं बलात्कारी' या हिट ट्रॅकच्या निषेधार्थ मुली रस्त्यावर उतरल्या होत्या आणि हनी सिंगला तुरुंगात टाकण्याची मागणी करत होत्या. या प्रकरणी चंदीगड हायकोर्टात हनी सिंगविरोधात एफआयआर आणि जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. तपासाअंती असे आढळून आले की हनी सिंगने हे गाणे गायलेच नव्हते आणि न्यायालयाने गायकाची निर्दोष मुक्तता केली.
५) लैंगिक आणि मानसिक हिंसाचाराचा पत्नीचा आरोप

हनी सिंग केवळ त्याच्या गाण्यांमुळेच नव्हे तर पत्नीसोबतच्या वादामुळेही चर्चेत राहिला. हनी सिंगने 23 जानेवारी 2011 रोजी त्याची बालपणीची मैत्रिण शालिनी सिंहसोबत लग्न केले. दहा वर्षांनंतर शालिनीने हनीवर लैंगिक आणि मानसिक हिंसाचाराचा आरोप केला. हनी आणि शालिनी यांच्यात बराच काळ वाद सुरू होता आणि दोघेही वेगळे राहतात.
हेही वाचा - आलिया भट्टने करुन दिली 'ब्रह्मास्त्र'मधील तिच्या व्यक्तिरेखेची ओळख, पाहा व्हिडिओ