हैदराबादः केजीएफ चित्रपटामुळे पॅन-इंडिया कीर्ती मिळविणारा कन्नड सुपरस्टार यश आता आगामी कन्नड अॅक्शन-ड्रामा केजीएफच्या दुसऱ्या चॅप्टरची वाट पाहत आहे. बदलत्या हवामानुळे सेट पुन्हा पुन्हा उभा करावा लागण्यापासून ते ज्यूनियर आर्टिस्ट टिकवण्यात आलेल्या अडचणी त्याने सांगितल्या.
केजीएफ चॅप्टर २ च्या टीझरला जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे सुपरस्टार यशने सांगितले आहे. एक मुलाखतीत त्याने या चित्रपटाच्या सेटवर आलेल्या अनेक अडचणींचा पाढाच वाचून दाखवला.
अनेकवेळा सेट पुन्हा उभा करावा लागला
कठीण शूटिंग प्रक्रियेबद्दल बोलताना यश म्हणाला की, ''सोन्याच्या खाणींमध्ये शूट करण्यासाठी संपूर्ण टीमने खूप संघर्ष केला. बदलत्या हंगामाचा परिणाम सेटवर होत होता. त्यामुळे कला दिग्दर्शक शिवकुमार जे. यांना अनेकवेळा सेट पुन्हा उभा करावा लागला.''
सर्व कलाकारांचा वीमा उतरवण्यात आला
यश म्हणाला, ''जेव्हा २००० लोकांचा टीम काम करत असेल तेव्हा काहीही होऊ शकते आणि अप्रिय गोष्टी टाळण्यासाठी निर्मात्यांनी सर्वांचा वीमा उतरवला होता. परंतु खाणींमध्ये शूटिंग करत असताना टीमला तेवढेच मोठे आव्हान होते कारण सिनेमाच्या चकाकी आणि ग्लॅमरमागील वास्तवाचा अनुभव घेत सेटमधून एक्स्ट्रा कलाकार पळून जात असत.''
एक दिवस शुटिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कलाकार पुन्हा येत नसत
केजीएफच्या सेटवर कलाकार टिकत नसत याबद्दल यश म्हणाला, "हे खूप कठीण होते आणि खूप गरम व्हायचे. शूटिंगपासून एक्स्ट्रा कलाकार पळून जायचे. सुरुवातीला ते आनंदाने म्हणायचे, 'ठीक आहे आम्हाला केजीएफचा भाग व्हायचं आहे, आम्ही तुझे चाहते आहोत. बहुतेक इतर कलाकार सेटवर जायचे म्हणून शुटिंगला यायचे. हे सर्व खरोखरच उत्साही होते परंतु ते एक दिवसानंतर पळून जात असत. हे इतके कठीण होते की आम्हाला अतिरिक्त लोकांची काळजी घेण्यासाठी काही लोकांना भाड्याने घ्यावे लागले.''
यश म्हणाला, ''एक काळ असा होता की जेव्हा बेंगळुरूमधील कोणत्याही ज्यूनियर आर्टिस्टना केजीएफ 2 च्या सेटवर काम करायचे नव्हते. मग निर्मात्यांनी मैसूरहून लोक जमा केले. नंतर अशी परिस्थिती होती की इतर राज्यांतील कलाकार घ्यावे लागले. खाणीमध्ये काम करण्याचा कठीण अनुभव आल्यामुळे लोक परत काम करण्यास तयार नव्हते.''
केजीएफ: चॅप्टर १ हा चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला बेस्ट अॅक्शन आणि स्पेशल इफेक्टसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
हेही वाचा - बीएमसीची कारवाई, सोनू सूद पवारांच्या दारी
केजीएफः चॅप्टर 2 मध्ये संजय दत्त आणि रवीना टंडन एक शक्तिशाली व्यक्तिरेखा म्हणून काम करीत आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -मुंबई महापालिकेची माझ्यावरील कारवाई हा भेदभाव - सोनू सूद