ETV Bharat / sitara

कंगनाच्या घरी ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा टीम दाखल - कंगना मुंबईला येणार

गृह मंत्रालयाकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मिळालेली ‘वाय’ श्रेणीची सुरक्षा टीम सोमवारी रात्री उशिरा मनालीला पोहोचली आहे. त्याचवेळी, हिमाचल सरकारकडून कंगनाच्या घरात आधीच सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या ‘वाय’ श्रेणीच्या सुरक्षेमुळे आता कंगनाच्या घराची सुरक्षा अधिक कडेकोट झाली आहे. त्याचबरोबर कंगना आपल्या कुलदेवींकडून आशीर्वाद घेण्यासाठी आज मंडीलाही जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Kangana's house
कंगनाच्या घरी वाय कॅटॅगिरी सुरक्षा टीम दाखल
author img

By

Published : Sep 8, 2020, 1:25 PM IST

मनाली - गृह मंत्रालयाकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मिळालेली 'वाय' श्रेणीची सुरक्षा टीम सोमवारी रात्री उशिरा मनालीला पोहोचली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत कंगना मनालीहून मुंबईला रवाना होईल.

हे संरक्षण गृह मंत्रालयाने कंगनाला प्रदान केले आहे. या सुविधेबद्दल तिने गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. सोमवारी पोलीस कर्मचार्‍यांनी हिमाचल सरकारच्या वतीने कंगनाच्या घरात बंदोबस्त ठेवला आहे. गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या ‘वाय’ श्रेणीच्या सुरक्षेमुळे आता कंगनाच्या घराची सुरक्षा अधिक कडेकोट झाली आहे.

कंगनाच्या घरी वाय कॅटॅगिरी सुरक्षा टीम दाखल

शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात ट्विटर वॉर झाले होते. त्यामध्ये कंगनाने बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असे म्हटले होते. त्यानंतर, इतकी भीती वाटते तर, मुंबईलाच येऊ नकोस, असा सल्ला राऊत यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर कंगना मुंबईत परतण्याची तयारी करीत आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सुरक्षेमुळे तिचा मुंबईत येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

उद्या (बुधवारी) कंगना मुंबईला परतणार असली तरी, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंगना आज आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आई-वडिलांना भेटायला मंडईला जाऊ शकते.

त्याचवेळी डीएसपी मनाली संजीव कुमारही कंगनाच्या घरी पोहोचले आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मंगळवारी सकाळी 10:45 मिनिटांनी कंगनाच्या घरी सिमसा येथे पोहोचलेल्या मनाली पोलिस अधिकाऱ्यांनी येथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत.

कंगना उद्या मुंबईत दाखल होईल. वाय दर्जाच्या सुरक्षा पथकासह ती मुंबईत परतणार आहे. यापूर्वी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तिच्या मुंबई प्रवेशाला विरोध करायचे ठरवले होते. त्यामुळे उद्या नेमके काय घडणार, याची उत्सुकता लागून राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.