मुंबई - मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारा अभिनेता वैभव तत्ववादी म्हणतो की काजोलच्या आगामी ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काम करणे त्याच्यासाठी मास्टर क्लासमध्ये सामील होण्यासारखे होते. 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'बाजीराव मस्तानी' सारख्या बॉलिवूड चित्रपटात दिसलेला वैभव म्हणाला,"काजोल मॅम आणि तन्वी आझमी मॅम या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळणे हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. दोघेही अत्यंत व्यावसायिक आणि मदत करणारे आहेत. एक कलाकार म्हणून त्यांना अभिनय करताना पाहणे अभिनयाच्या एखाद्या मास्टर क्लाहून वेगळे नव्हते. हे मी कुठल्याही अभिनयाच्या कार्यशाळेत शिकलो नसतो."
'त्रिभंगा : ढेढ़ी-मेढ़ी क्रेजी' हा डिजिटल चित्रपट असून त्याद्वारे अभिनेत्री रेणुका शहाणे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे.
या चित्रपटाविषयी वैभव पुढे म्हणाला, "रेणुका शहाणे मॅम या चित्रपटासाठी दिग्दर्शन करीत असलेल्याचा खूप आनंद झाला. मी त्यांच्या कौशल्याचे कौतुक करतो. त्यांना कलाकारांकडून काय हवे आहे हे माहित आहे आणि त्या खूप खंबीरपणे पाठीशी उभे राहतात आणि त्या प्रत्येक सीन खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. त्यांनी आम्हाला स्वत: ला कॅमेर्यासमोर व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही दिले. या संपूर्ण चित्रपटाचा शूटींग अनुभव मी आयुष्यभरासाठी मनापासून बाळगणार आहे. "
हेही वाचा - बॉलिवूड ट्विट प्रकरण; कंगनाला मुंबई उच्च न्यायलयाचा दिलासा कायम