ETV Bharat / sitara

"माझा छळ का होतोय? मला देशाकडून उत्तर हवंय", कंगनाचे जनतेला आवाहन - Kangana latest news

माझा मानसिक, भावनिक आणि आता शारीरिक छळ का होत आहे? मला या देशाकडून उत्तरे हवी आहेत .... मी तुमच्यासाठी उभी राहिली आहे आता तुम्ही माझ्या बाजूने उभे राहा, असे लोकांना आव्हान कंगना रणौतने एका व्हिडिओतून केले आहे. तिचा हा व्हिडिओ वांद्रे स्टेशनमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या वेळी ट्विटरवर पोस्ट करण्यात आलाय.

Kangana
कंगना रणौत
author img

By

Published : Jan 8, 2021, 4:50 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौतची आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी होणार आहे. यासाठी ती व तिची बहिण रंगोली चंदेल हजर झाल्या आहेत. आपली होत असलेली पोलीस चौकशी हा मानसिक, भावनिक आणि शारीरिक छळाचा एक भाग असल्याचे कंगनाने ट्विटरवर म्हटले आहे. मला या देशाकडून उत्तरे हवी आहेत. मी तुमच्या हितासाठी उभी राहिलेली आहे आता तुम्ही माझ्यासाठी उभे राहा असे आवाहन तिने ट्विटरवर केले आहे. आज दुपारी १२ वाजून १४ मिनीटांनी तिने एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

कंगना रणौत

या व्हिडिओमध्ये कंगना म्हणते, नमस्ते, ''जेव्हा मी देश हिताची गोष्ट बोलते, ज्या प्रकारे माझ्यावर अत्याचार केला जात आहे, माझे शोषण केले जात आहे, ते सर्व देश पाहात आहे. बेकायदेशीरपणे माझे घर पाडण्यात आले, शेतकरी हिताच्या बाबतीत मी बोलल्यानंतर माझ्यावर असंख्ये केसेस दाखल केल्या जात आहे. इतके की मी हसले म्हणूनही माझ्यावर केस दाखल झाली आहे. माझी बहिण रंगोलीने कोरोनाच्या सुरुवातीला डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या विरुध्द आवाज उठवला होता, तिच्यावरही केस झाली. त्यात माझेही नाव घालण्यात आले, तेव्हा तर मी ट्विटरवर नव्हते. असं होत नाही पण आपल्या चीफ जस्टीसनी हे केस रिजेक्ट केली आणि म्हटले की या केसला काही अर्थ नाही.''

महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा उल्लेख करीत आपल्यावरही कसा अन्याय होत आहे हे सांगताना ती पुढे म्हणाली, ''त्याबरोबरच मला आता चौकीवर जाऊन हजेरी लावायला सांगितले जात आहे, मला कोणी सांगत नाही की कशा प्रकारची ही हजेरी आहे. मला हेही सांगितले जातंय की माझ्याबाबतीत जो अन्याय होतोय तो कोणाशीही बोलू शकत नाही. मी आता सुप्रिम कोर्टालाच विचारते की, हा काय मध्ययुगीन काळ आहे की जिथे महिलांना जीवंत जाळले जात आहे, ती कोणाशी बोलूही शकत नाही, अशा प्रकारचे अत्याचार संपूर्ण जागासमोर घडत आहेत. मला लोकांना हेच म्हणायचे आहे जे लोक आज हा तमाशा पाहात आहेत, त्यांना विचारते की रक्ताचे अश्रू हजार वर्षांच्या गुलामगिरीमध्ये सहन केले आहेत, ते पुन्हा सहन करावे लागतील, जर राष्ट्रवादी आवाजाला गप्प करण्यात आले, जय हिंद.'', असे ती शेवटी म्हणाली.

हेही वाचा - २ तासाच्या चौकशीनंतर कंगना रणौत पोलीस स्टेशनमधून बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.