ETV Bharat / sitara

जेव्हा शेन वॉर्नच्या फिरकीवर शाहरुख खानने मारला होता चौकार

शेन वॉर्नने आयपीएलचे पहिले विजेतेपद (2008) जिंकून इतिहास रचला. शाहरुख खानने शेन वॉर्नच्या चेंडूवर चौकार मारला तेव्हाच्या आयपीएलच्या दिवसातील एका किस्सा आपण जाणून घेऊयात.

शेन वॉर्न
शेन वॉर्न
author img

By

Published : Mar 5, 2022, 1:22 PM IST

मुंबई - क्रिकेट जगतात 'फिरकीचा जादूगार' शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या महान क्रिकेटपटूचे गेल्या शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या बातमीने देश-विदेशातील शेन वॉर्नच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून आयपीएलपर्यंत शेन वॉर्नचा दबदबा होता. शेन वॉर्नने आयपीएलचे पहिले विजेतेपद (2008) जिंकून इतिहास रचला. शाहरुख खानने शेन वॉर्नच्या चेंडूवर चौकार मारला तेव्हाच्या आयपीएलच्या दिवसातील एका किस्सा आपण जाणून घेऊयात.

आपल्याला माहिती असेल की, भारतात 2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली होती. त्यावेळी शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व केले. कर्णधार म्हणून पहिल्या आयपीएलमध्ये शेन वॉर्नच्या संघाने शाहरुख खानच्या संघ कोलकाता नाईट रायडर्सचा अंतिम फेरीत पराभव केला होता. या जेतेपदाचे नाव शेन वॉर्नच्या रेकॉर्डच्या यादीतही नोंदवले गेले.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आयपीएल दरम्यान बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्समध्येही खूप धमाल पाहायला मिळाली. अशीच एक घटना आहे, जेव्हा आयपीएल दरम्यान बॉलीवूडचा बादशाह बॅट धरून मैदानावर गेला होता. या व्हिडिओमध्ये शाहरुख प्रत्येक गोलंदाजाच्या चेंडूवर आलटून-पालटून शॉट्स मारताना दिसत आहे.

यादरम्यान सुनील गावस्कर यांनीही शाहरुख खानला बॉल टाकला होता. त्यावेळी सुनील गावस्करनंतर शेन वॉर्नने शाहरुखसमोर आपली फिरकी खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र किंग खान मैदानातही बादशाह ठरला आणि शेनचा चेंडू ऑफसाइटच्या दिशेने जोरदार टोलवला. बरं, ही सगळी मैदानातली एक गंमत होती.

हेही वाचा - विमानतळावर केक कापून जान्हवी कपूरचे सुरू झाले बर्थडे सेलेब्रिशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.