ETV Bharat / sitara

'सडक २' चा  'या' तारखेला डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार  प्रीमियर - आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या भूमिका असेलेला सडक २

आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या प्रमुख भूमिका असेलेली प्रेमगाथा, 'सडक २' च्या निर्मात्यांनी गुरुवारी जाहीर केले की फ्रँचायझीचा बहुप्रतिक्षित दुसरा भाग २८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल. ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर चित्रपटाचा प्रीमियर होईल.

Sadak 2
'सडक २'
author img

By

Published : Aug 6, 2020, 4:05 PM IST

मुंबई - आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूरच्या बहुप्रतीक्षित सडक 2 चित्रपटाचा प्रीमियर येत्या 28 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर होणार आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर आलियाने इन्स्टाग्रामवर शेअर केले तेव्हा आतिने ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

सडक २ हा चित्रपट आलियाच्या वडिलांचा सीक्वल चित्रपट आहे. १९९१ मध्ये महेश भट्ट यांनी सडक हा चित्रपट बनवला होता. यात पूजा भट्ट आणि संजय दत्तची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाचा सीक्वल तब्बल २९ वर्षांनी येत आहे. या चित्रपटात महेश भट्ट यांची दुसरी मुलगी आलिया प्रमुख भूमिकेत आहे.

हेही वाचा -दिशा सालीयन मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांचे आवाहन

पूजा भट्ट आणि संजय दत्त हे दोघेही त्यांच्या आधीच्या सडक चित्रपटातील मूळ व्यक्तीरेखा या सीक्वलमध्येही साकारत आहेत. मात्र, कथेचा तपशील अद्यापही हाती आलेला नाही. या सिनेमात जिशु सेनगुप्ता, मकरंद देशपांडे, गुलशन ग्रोव्हर, प्रियांका बोस, मोहन कपूर आणि अक्षय आनंद मुख्य भूमिकेत आहेत.

विशाल फिल्म्स आणि फॉक्स स्टार स्टुडिओनिर्मित हा सिनेमा मूळत: 10 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना साथीच्या प्रसारामुळे देशभर सर्वच थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.