मुंबई - ज्येष्ठ संगीतकार-गायक बप्पी लाहिरी यांनी एकदा किशोर कुमार यांची आनंददायी शेवटची आठवण सांगितली होती. त्यांचे शेवटचे गाणे एकत्र रेकॉर्ड करताना दिग्गज पार्श्वगायक किशोरदा यांनी सर्वांना कसे हसवले याची आठवण त्यांनी सांगितली.
मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच्या भूमिका असलेला वक्त की आवाज या चित्रपटासाठी 'गुरु गुरु' हे गाणे रेकॉर्ड करायचे होते. मुंबईच्या मेहबूब स्टुडिओमध्ये बप्पी लाहिरी यांनी किशोर कुमार यांच्या आयुष्यातील शेवटचे गाणे रेकॉर्ड केले. गाण्यात खोडकरपणा असल्याने किशोरदा यांनी गाण्याच्या प्रवाहाबरोबर इतका खट्याळपणा केला की स्टुडिओतील सर्वजण गालावर अश्रू येईपर्यंत हसत होते.
"त्या दिवशी, मामा (बप्पीदा किशोर कुमारना या नावाने बोलवत असत ) सर्वांना इतके हसवले की आम्ही हसून हसून थकलो होतो. मग निघताना ते मला म्हणाले 'बप्पी आज मैने हसाया, मैं जब नहीं रहूंगा तो याद करोगे किशोर मामा को'. मी 6 वाजता मेहबूब स्टुडिओ सोडला आणि 2 वाजता मला घरी बातमी मिळाली की ते आता राहिले नाहीत. मामासाठी माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. मी त्यांच्या खूप जवळ होतो. अमित कुमार आणि सुमित कुमार ही त्यांची मुले आहेत पण तरीही मी त्यांच्या खूप जवळचा होतो, इतर कोणापेक्षाही जास्त,” किशोर कुमारची आठवण करताना बप्पी लाहिरी भावनिक झाले होते.
डिस्को डान्समधलं याद आ रहा है हे गाणं कसं आलं याबद्दलही त्यांनी खुलासा केला होता. "हे गाणे खरे तर मला किशोर कुमारजी यांनी दिलेला आशीर्वाद आहे. याद आ रहा है, हे गाणे खरे तर किशोर कुमारजी गाणार होते. त्यांची फ्लाइट उशीर झाली होती त्यामुळे ते एचएमव्ही स्टुडिओत आले होते आणि मी तिथे आधीच पोहोचलो होतो. डब करून गाणे तयार ठेवले होते. ते त्यांनी ऐकले आणि म्हणाले, 'बप्पी, तू मनापासून गायले आहेस, मी यापेक्षा चांगले गाऊ शकत नाही'. मी मामाला सांगितले की, 'मामा, हे गाणे मी तयार केले आहे. तुमच्यासाठी'. यावर ते म्हणाले, 'मला दुसरं एखादं गाणं दे, मी त्यावर गायन करेन. मात्र हे गाणं फक्त तूच गा. तुझा आवाज या गाण्याला शोभतो', असं ते म्हणाले होते.
ज्येष्ठ संगीतकार-गायक यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत निधन झाले. ते २०२१ पासून ओएसए (obstructive sleep apnea) या आजाराशी झुंज देत होते.
हेही वाचा - Rip Bappi Lahiri: भारतात डिस्को ट्यून आणणारे बप्पी लाहिरी