मुंबई - अभिनेत्री इव्हलिन शर्मा अनेक बॉलिवूड सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यानंतर आता ती बहुचर्चित साहो सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत काम करणं हे इव्हलिनसाठी अधिक खास होतं. कारण ती प्रभासची खूप मोठी चाहती आहे.
इव्हलिननं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन प्रभाससोबतचा एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, बाहुबलीची मी खूप मोठी चाहती आहे. अशात प्रभाससोबत काम करण्यासाठी मी किती उत्साही असेल, याचा विचार तुम्ही करु शकता. जेव्हा मला सुजित(साहोचे दिग्दर्शक) यांचा फोन आला आणि त्यांनी मला साहोमध्ये काम करण्यासाठी विचारणा केली, तेव्हा क्षणाचााही विलंब न करता मी त्यांना हो म्हटलं.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इव्हलिननं आतापर्यंत इश्क, यारिया, मैं तेरा हिरो, जब हॅरी मेट सेजलसारख्या अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर ये जवानी हैं दिवानी सिनेमातील तिची भूमिका विशेष गाजली. दरम्यान श्रद्धा कपूर आणि प्रभास यांच्या मुख्य भूमिका असलेला साहो सिनेमा येत्या ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.