ETV Bharat / sitara

पाहा, सुश्मित सेनची छोट्या लेकीने मदर्स डे बनवला खास - सुश्मिता सेनचा मदर्स डे

सुष्मिता सेनची लहान मुलगी अलिशा सेनला आईला कसे खूश करायचे हे नक्कीच माहित आहे. तिने मदर्स डेचा दिवस आईसोबत खास बनवला होता.

sushmita sen mothers day post
सुष्मिता सेनची लहान मुलगी अलिशा
author img

By

Published : May 10, 2021, 8:44 PM IST

मुंबई - अभिनेत्री सुष्मिता सेन हिने आपली छोटी मुलगी अलिशा सेनने मदर्स डे कसा साजरा केला याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

रविवारी रात्री सुष्मिता सेन हिने इन्स्टाग्रामवर अलिशाच्या प्रेमळ इशार्‍याचा खुलासा करणारा एक व्हिडिओ शेअर केला. यात सुश्मिताने तिच्या ११ वर्षाच्या लेकीने मदर्स डे निमित्ताने बनवलेल्या पेंटिंगची झलक दाखवली आहे.

माझ्या लेकीने हाताने बनवलेले हे ड्रॉइंग..वेळ, प्रयत्न आणि पैसा खरेदी करु शकत नाहीत अशा भेटवस्तू ... मी ज्या प्रकारच्या भेटवस्तू पसंत करते त्या तिने मला भेटदिल्या आणि मदर्स डे खास बनवला असे सुश्मिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

सुश्मिताने लेक अलिशाला भरपूर आशिर्वादही दिले आहेत. लेकीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तिने ह्रदयाच्या इमोजींचा मुक्त हस्ते वापर केला आहे.

सुष्मिता सेनने २०१० मध्ये अलिशा हिला आणि मोठी मुलगी रेनी हिला २०००मध्ये दत्तक घेतले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.