ETV Bharat / sitara

सोनू सूदच्या घराबाहेर कोविडमुळे रंजल्या गांजलेल्यांची रीघ

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घराबाहेर कोविडमुळे रंजल्या गांजलेल्या लोकांची रीघ लागलेली असते. नाना तऱ्हेचे प्रश्न घेऊन गरजू लोक सोनूच्या भेटीसाठी आलेले असतात. अश गरजवंतांना तारणहार बनून सोनू अविरत काम करीत आहे.

sonu sood meets needy
सोनू सूद गरजू लोकांसाठी ‘तारणहार’
author img

By

Published : Jun 5, 2021, 4:49 PM IST

अभिनेता सोनू सूदने मागील वर्षापासून, त्याने लोकांना शक्य तेवढी मदत करणे चालूच ठेवले आहे. आज मुंबईतील आपल्या आपल्या घराबाहेर आलेल्या गरजूंची विचारपूस करण्यासाठी तो बाहेर आला. त्यांची तक्रार ऐकून तातडीने त्यांना मदतीची ग्वाही त्याने दिली. स्थलांतरितांसाठी प्रवासाची सुविधा, गरजूंना अन्न आणि औषधांचा पुरवठा, रुग्णांना बेड उपलब्ध करुन देणे अशी असंख्य परोपकारी कामे तो देशभर करीत आहे.

सोनू सूद गरजू लोकांसाठी ‘तारणहार’

सोनूकडे खूप अपेक्षा ठेवून लोक येत असतात. त्याच्या सूद फाउंडेशनच्या वतीने त्यांना मदत करण्यासाठी तो आणि त्याची टीम कार्यरत असते. आज आलेल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. यापूर्वी त्यांनी रितसर आपल्या अडचणी लोकांना सोनूपर्यंत पोहोचवलेल्या असतात. यातील अनेकांची कामे मार्गस्थ झालेले असतात.

सोनूच्या घराबाहेर आलेल्या लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रचंड प्रेम आणि उपकाराची भावना दिसून येते. सोनूदेखील त्यांना तितक्याच प्रेमाने वागवतो, विचारपूस करतो आणि त्यांना वचन देऊन पाठवतो. ज्या लोकांना सोनूला प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही ते फोन करतात, त्यांच्या वेबसाइटवर, हेल्पलाइन नंबरवर अडचणी कळवतात. सोनू त्यांना देवदूतासारखा वाटतोय.

हेही वाचा - HBD विजू शाह : एकाचवेळी अनेक सिंथेसाइजर्सवर हजारोंना नाचवणारा "द किंग ऑफ सिंथ साउंड्स"

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.