मुंबई - बॉलिवूड स्टार हृतिक रोशन अभिनेत्री-संगीतकार सबा आझादसोबतच्या कथित रोमान्समुळे चर्चेत आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस या दोघांनी पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दर्शन दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बरोबर एका आठवड्यानंतर हृतिक पुन्हा त्याच्या कथित मैत्रिणीसोबत डिनर डेटसाठी बाहेर पडला.
शुक्रवारी रात्री, हृतिक आणि सबा मुंबईच्या खार भागातील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसले. या रेस्टॉरंटमधील पदार्थ सेंद्रिय, निरोगी आणि फार्म-टू-टेबल सर्व्ह होत असल्यामुळे चर्चेत आहे. या हॉटेलमधून बाहेर पडतानाचे हृतिक आणि सबाच्या डिनर डेटचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हृतिक-सबाच्या डिनर डेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी प्रतिक्रियांना सुरुवात केली. त्याने कथित प्रेयसीचा हात कसा धरला याबद्दल चर्चा सुरू झाली. एका चाहत्याने लिहिले, "ज्या प्रकारे त्याने तिचा हात धरला याचा अर्थ त्यांच्यात प्रेम आहे.," तर दुसऱ्याने लिहिले, "ज्या प्रकारे ती त्याला तिचा हात देते याचा अर्थ प्रेम आहे." हृतिकला प्रेम मिळाल्याचे दिसत असल्याने चाहतेही खूश आहेत. "त्याच्यासाठी चांगले आहे. तो जवळजवळ 50 वर्षांचा आहे आणि त्याने फक्त अनौपचारिक संबंध केले आहेत. आता त्याची माजी पत्नी तिच्या गोष्टी सार्वजनिकपणे करत असल्याने त्याला देखील काहीतरी करण्याची गरज आहे," असे एका चाहत्याने म्हटले आहे.
कंगना रणौतसोबतचा कथित रोमान्स बिघडल्यानंतर हृतिक सिंगल होता. ह्रतिकने 2000 मध्ये त्याच्या बालपणीची प्रेयसी सुझान खानशी लग्न केले. लग्नाच्या 14 वर्षानंतर हे जोडपे सौहार्दपूर्णपणे वेगळे झाले आणि त्यांना दोन मुलगे हृहान रोशन आणि हृधन रोशन आहेत.
दरम्यान, सबा आझाद नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह यांचा मुलगा इमाद शाह याच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती आहे. 2013 मध्ये हे दोघे एकत्र आले आणि 2020 मध्ये त्यांच्यातील प्रणय संपुष्टात आला. कामाच्या आघाडीवर सबा आझादच्या 'रॉकेट बॉईज'चा प्रीमियर 4 फेब्रुवारी रोजी झाला आणि तिने हृतिकसोबत डिनर डेटवर रिलीज साजरे केल्याचे दिसत आहे.
हेही वाचा - ‘कॉंट्रोव्हर्सी क्वीन’ कंगना रणौत करणार ‘लॉक अप' शोचे सूत्रसंचालन