ETV Bharat / sitara

Bajiprabhu's Struggle Pavankhind: योद्धा बाजीप्रभूंची झुंज दिसणार 'पावनखिंड' मध्ये! - Pavankhind

सध्या चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना सुगीचे दिवस (Good day to historical movies) आहेत. शिवकालीन चित्रपटांना प्रेक्षकांनी कायम उचलून धरले आहे. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर (Writer director actor Digpal Lanjekar) यांनी शिवकालीन चित्रपटांचे अष्टक बनविण्याचा विडा उचलला आहे. या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' हे चित्रपट आणले. आता त्यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरे सुवर्णपान 'पावनखिंड' चित्रपटाच्या निमित्ताने उलगडले आहे.

पावनखिंड
Pavankhind
author img

By

Published : Feb 11, 2022, 5:19 PM IST

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासांच्या पानांत दडलेले वैभव रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे सर्व गुण शिवरायांच्या मावळ्यांच्या रक्तात अक्षरश: भिनले होते. त्याच पवित्र रक्ताने पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास 'पावनखिंड' या आगामी चित्रपटात पहायला मिळणार आहे.

'तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला!' असं म्हणत मृत्यूलाही थांबायला सांगणाऱ्या शूरवीर, महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडें यांच्या शौर्याची यशोगाथा 'पावनखिंड' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकल्यानंतर त्यांच्याबरोबर गडावर हिरडस मावळातील बांदलांचा जमाव होता. त्यातील एक हिरा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. हिरडस मावळातील बांदल राजांचा हा उजवा हात. ‘बहुत मर्द, मोठा धाडसी, कजाखदार, कटाक्ष, सर्वगुणयुक्त’ असं त्यांचं वर्णन केलं जातं.

भोरपासून तीन मैलांवर सिंद हे बाजीप्रभूंचं जन्मगाव आहे. पावनखिंडीच्या झुंजीमध्ये बाजीप्रभूंनी बलिदान केलं आणि बाजीप्रभू हे नाव शिवइतिहासामध्ये अजरामर झालं. अर्ध सैन्य घेऊन गडाच्या दिशेनं निघालेले राजे पोहोचून तोफेचा आवाज कानी येईपर्यंत बाजीप्रभूंनी बांदल सेनेच्या साथीनं घोडखिंडीत अखेरचा श्वास असेपर्यंत लढा देत गनिमाला थोपवून धरलं. बाजीप्रभू आणि बांदल सेनेच्या रक्तानं पावन झालेली घोडखिंड पुढे ‘पावनखिंड’ म्हणून ओळखली जाऊ लागली. अंगावर रोमांच आणणारा हा इतिहास 'पावनखिंड' चित्रपटात पहायला मिळणार आहे.

या चित्रपटासाठी चिन्मय मांडलेकरने पुन्हा शिवरायांचं रूप धारण केलं आहे. मृणाल कुलकर्णी, वैभव मांगले, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. ए.ए.फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित 'पावनखिंड'ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे.

मृत्यूलाही प्रतीक्षा करायला लावणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे यांच्या वीरतेवर आधारित 'पावनखिंड' हा चित्रपट येत्या १८ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.