ETV Bharat / sitara

तू कायम स्मरणात राहशील, वाजिद यांच्या निधनावर सलमानने व्यक्त केलं दुःख

वाजिद मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहिल, तुझ्याबद्दलचा आदर कायम राहिल, तुला एक उत्तम व्यक्ती आणि तुझ्या कौशल्यामुळे नेहमीच मिस करत राहीन. तुझ्या आत्म्याला शांती मिळो, असे सलमान खानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वाजिद यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

salman khan condoles wajid khan death
वाजिद यांच्या निधनावर सलमानने व्यक्त केलं दुःख
author img

By

Published : Jun 1, 2020, 4:57 PM IST

मुंबई - प्रसिद्ध गायक आणि संगीतकार वाजिद खान यांचे सोमवारी मध्यरात्री कोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनावर अभिनेता सलमान खानने शोक व्यक्त केला आहे. साजिद- वाजिद यांची जोडी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी होती.

साजिद आणि वाजिद यांनी सलमान खानच्या वॉन्टेड, दबंग आणि एक था टायगरसारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे. त्यांच्या या कामाला विशेष पसंतीदेखील मिळाली होती. वाजिद यांनी नुकतंच सलमानचं प्यार करोना आणि भाई भाई हे गाणंही कंपोज केलं होतं. लॉकडाऊनदरम्यान यूट्यूबवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं.

वाजिद मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहिल, तुझ्याबद्दलचा आदर कायम राहिल, तुला एक उत्तम व्यक्ती आणि तुझ्या कौशल्यामुळे नेहमीच मिस करत राहिल. तुझ्या आत्म्याला शांती मिळो, असे सलमान खानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वाजिद यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना किडनीसंबंधीच्या काही समस्या होत्या. साजिद यांनी माध्यमांना सांगितले, की वाजिद यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाला आहे. सोबतच त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.