ETV Bharat / sitara

उरी पाठोपाठ बालाकोट 'एअर स्ट्राइक'वरही येणार सिनेमा, विवेक करणार निर्मिती - लढाऊ विमान

बालाकोट येथे एअर स्ट्राइक केला. यात दहशतवादी तळ उद्धवस्त केले गेले. या एअर स्ट्राइकमधील एका व्यक्तीचं नाव भारताच्या इतिहासात अमर झालं ते म्हणजे 'अभिनंदन' होय. यांच्यावर आणि बालाकोट एअर स्ट्राईकवर आधारित सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बालाकोट एअर स्ट्राइकरही येणार सिनेमा
author img

By

Published : Aug 23, 2019, 5:33 PM IST

मुंबई - १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा येथील दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक केला. यात दहशतवादी तळ उद्धवस्त केले गेले. या एअर स्ट्राइकमधील एका व्यक्तीचं नाव भारताच्या इतिहासात अमर झालं. ते म्हणजे अभिनंदन होय. त्यांच्या आणि बालाकोट एअर स्ट्राईकवर आधारित सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेता विवेक ओबेरॉय करणार आहे. बालाकोट - द ट्रु स्टोरी असं शीर्षक असणाऱ्या या सिनेमाचं चित्रीकरण जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा या ठिकणी केलं जाणार आहे. चित्रपट हिंदींसह तामिळ आणि तेलुगू या दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या वर्षा अखेरीस हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पाकिस्तानच्या एफ-16 या लढाऊ विमानाचा पाठलाग करताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले होते. पाकिस्तानने लगेच त्यांना कैदेत घेतले होते. कैदेत असताना त्यांच्याकडून भारतीय लष्कराची महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला, परंतु अभिनंदन या परिस्थितीतही खंबीरपणे उभा राहिले, त्यांची हीच कथा या सिनेमात पाहायला मिळेल.

Intro:Body:

उरी पाठोपाठ बालाकोट एअर स्ट्राइकरही येणार सिनेमा, विवेक करणार निर्मिती

मुंबई - १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा येथील दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक केला. यात दहशतवादी तळ उद्धवस्त केले गेले. या एअर स्ट्राइकमधील एका व्यक्तीचं नाव भारताच्या इतिहासात अमर झालं. याच अभिनंदन यांच्यावर आणि बालाकोट एअर स्ट्राईकवर आधारित सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेता विवेक ओबेरॉय करणार आहे. बालाकोट - द ट्रु स्टोरी असं शीर्षक असणाऱ्या या सिनेमाचं चित्रीकरण जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा या ठिकणी केलं जाणार आहे. चित्रपट हिंदींसह तामिळ आणि तेलुगू या दाक्षिणात्या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या वर्षा अखेरीस हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

पाकिस्तानच्या एफ-16 या लढाऊ विमानाचा पाठलाग करताना भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-21 विमान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. विमानाला आग लागल्याने अभिनंदन यांनी पॅराशूटने बाहेर उडी मारली आणि ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले होते. पाकिस्तानने लगेच त्यांना कैदेत घेतले होते.  कैदेत असताना त्यांच्याकडून भारतीय लष्कराची महत्त्वपूर्ण माहिती काढून घेण्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराने आटोकाट प्रयत्न केला, परंतु अभिनंदन या परिस्थितीतही खंबीरपणे उभा राहिले, त्यांची हीच कथा या सिनेमात पाहायला मिळेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.