हैदराबाद - हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'विक्रम वेधा' या चित्रपटातील सैफ अली खानच्या 'विक्रम' या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक 24 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन 'वेधा'ची भूमिका साकारत आहे. 'विक्रम वेधा' हा चित्रपट दक्षिणेतील अभिनेता विजय सुतेपती स्टारर तमिळ चित्रपट 'विक्रम वेधा'चा हिंदी रिमेक आहे. 30 सप्टेंबरला हृतिक-सैफचा 'विक्रम वेधा' सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही माहिती दिली आहे. 'विक्रम वेध' चित्रपटातील सैफ अली खानच्या 'विक्रम' या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
-
'VIKRAM VEDHA': SAIF FIRST LOOK TOMORROW... Team #VikramVedha will unveil #FirstLook of #SaifAliKhan as #Vikram from #VikramVedha tomorrow [24 Feb 2022]. #HrithikRoshan #BhushanKumar #RelianceEntertainment #VikramFirstLook pic.twitter.com/yPH4k4T1ex
— taran adarsh (@taran_adarsh) February 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">'VIKRAM VEDHA': SAIF FIRST LOOK TOMORROW... Team #VikramVedha will unveil #FirstLook of #SaifAliKhan as #Vikram from #VikramVedha tomorrow [24 Feb 2022]. #HrithikRoshan #BhushanKumar #RelianceEntertainment #VikramFirstLook pic.twitter.com/yPH4k4T1ex
— taran adarsh (@taran_adarsh) February 23, 2022'VIKRAM VEDHA': SAIF FIRST LOOK TOMORROW... Team #VikramVedha will unveil #FirstLook of #SaifAliKhan as #Vikram from #VikramVedha tomorrow [24 Feb 2022]. #HrithikRoshan #BhushanKumar #RelianceEntertainment #VikramFirstLook pic.twitter.com/yPH4k4T1ex
— taran adarsh (@taran_adarsh) February 23, 2022
याआधी चित्रपट निर्मात्यांनी हृतिक रोशनच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याचा चित्रपटातील फर्स्ट लूक देखील रिलीज केला होता. या चित्रपटात हृतिक गँगस्टर वेधाची भूमिका साकारणार आहे.
'वेधा'चा लूक रिलीज करताना, चित्रपट निर्माता कंपनी 'T-Series' ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, 'ऋतिक रोशनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, विक्रम वेधामध्ये वेधाचा फर्स्ट लूक रिलीज करताना आम्हाला आनंद होत आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी जगभरातील सिनेमागृहात चित्रपट रिलीज होणार आहे.
विक्रम आणि बेताल या भारतीय लोककथेवर आधारित हा चित्रपट विक्रम या कठोर पोलीस अधिकाऱ्याची कथा सांगतो, जो शक्तिशाली गुंड वेधाला पकडतो आणि मारतो. या चित्रपटात सैफ अली खान विक्रमची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात राधिका आपटेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'विक्रम वेधा' हा त्याच नावाच्या तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपटाचा रिमेक आहे. आर माधवन आणि विजय सेतुपती यांनी तमिळ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे पुष्कर आणि गायत्री हे त्याच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शक आहेत. याची निर्मिती एस शशिकांत आणि भूषण कुमार यांनी केली आहे.
हेही वाचा - शिबानी दांडेकरने फरहान अख्तरच्या तळहातावर लावली मेहंदी पाहा फोटो