ETV Bharat / sitara

विजय देवरकोंडाने शेअर केला माइक टायसनसोबतचा फोटो.. म्हणाला, "हा माणूस म्हणजे प्रेम आहे" - पुरी जगन्नाथ दिग्दर्शित, 'लाइगर'

विजय देवरकोंडाने त्याच्या चाहत्यांसाठी 'लाइगर' चित्रपटाच्या सेटवरील एका संस्मरणीय क्षणाचा फोटो शेअर केला आहे. बॉक्सिंग दिग्गज माईक टायसनसोबतचा हा फोटो चाहत्यांच्या भुवया उंचावणारा आहे.

विजय देवराकोंडाचा माईक टायसनसोबत फोटो
विजय देवराकोंडाचा माईक टायसनसोबत फोटो
author img

By

Published : Nov 16, 2021, 4:29 PM IST

हैदराबाद (तेलंगणा) - तेलुगू हार्टथ्रोब विजय देवरकोंडा याचा आगामी 'लाइगर' चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट सुरुवातीपासूनच प्रसिद्धीझोतात आला आहे परंतु कोविड-19 साथीच्या आजारामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचे शूट थांबवले होते. आता या सिनेमाचे शूट पुन्हा सुरू झाले असून 'लाइगर' सिनेमातून दिग्गज आंतरराष्ट्रीय बॉक्सर माईक टायसन बॉलिवूड पदार्पण करणार आहे.

मंगळवारी, विजयने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याचे आणि माईकचा एक फोटो शेअर केला. त्याने लिहिलंय, "हा माणूस म्हणजे प्रेम आहे. प्रत्येक क्षण माझ्यासाठी एक आठवण आहे! आणि ही एक कायमची खास असेल...#Liger Vs The Legend...जेव्हा मी बलदंड माइक टायसनच्या समोरासमोर आलो. "

2021 च्या दिवाळीच्या निमित्ताने, लाइगरच्या निर्मात्यांनी दिग्गज बॉक्सिंग चॅम्पियनच्या नवीन पोस्टरचे अनावरण केले होते. टायसन यात तडाखेबंद ठोसे मारताना दिसला होता.

1986 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी बॉक्सिंगच्या इतिहासातील सर्वात तरुण हेवीवेट चॅम्पियन बनण्याचा बहुमान माइक टायसनला मिळाला होता. हा व्यावसायिक बॉक्सर सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट हेवीवेट फायटरपैकी एक मानला जातो.

पुरी जगन्नाथ दिग्दर्शित, 'लाइगर'मध्ये अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा - Exclusive : 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' मालिका आजपासून सर्वांच्या भेटीला; डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी खास बातचीत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.