बॉलिवूडची नायिका नीतू कपूरने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. नीतू कपूरने बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. असाच एक सुपरहिट चित्रपट म्हणजे याराना. ज्यामध्ये नीतू आणि अमिताभ एका वेगळ्या भूमिकेत होते. नीतू कपूर यांनी या चित्रपटाच्या एका दृश्याचे नृत्यदिग्दर्शन केले होते.
सध्या नीतू यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे दृश्य शेअर केले आहे. या सीनमध्ये (अमिताभ बच्चन) अमिताभ बच्चन डान्सचा सराव करताना दिसतात. नीतू कपूर यांनी प्रथमच कोरिओग्राफ केल्याचे म्हटले आहे. नीतू कपूर यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की (याराना) यारानाचा हा देखावा खूप खास आहे कारण मी तो कोरिओग्राफ केला होता. हे दृश्य पहा ...
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विशेष म्हणजे आपल्या कारकीर्दीत नीतू कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत अमर अकबर अँथनी, दिवार, याराना, कभी कभी, परवरीश, काला पत्थर, कस्मे वादे, द ग्रेट गँबलर, अदालत या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. नीतू कपूर सध्या चित्रपटांमध्ये कमबॅक करत आहेत. वरुण धवन, कियारा अडवाणी आणि अनिल कपूर यांच्यासमवेत 'जुग जुग जिओ' या चित्रपटात त्या दिसणार आहेत.
हेही वाचा - प्रतीक बब्बरची बॉलिवूडमध्ये १३ वर्षे, म्हणाला, 'रोलरकोस्टर राइड' सारखा प्रवास