ETV Bharat / sitara

'दंगल'गर्ल सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेखसोबत विकी कौशल करणार स्क्रिन शेअर

author img

By

Published : Dec 13, 2021, 4:45 PM IST

कॅटरिना आणि विकी कौशल विवाहानंतर पुन्हा लवकरच कामावर परतणार आहेत. विकीच्या सॅम बहादूरचे चित्रीकरण जोरात सुरू होणार असून आरएसव्हीपी आणि मेघना गुलजारच्या या चित्रपटात आणखी दोन कलाकारांची एन्ट्री झाली आहे. फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​या 'दंगल' मधील बहिणी यात आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

मल्होत्रा, फातिमा सना शेखसोबत विकी कौशल
मल्होत्रा, फातिमा सना शेखसोबत विकी कौशल

नुकतेच विकी कौशलचे कॅटरिना कैफ सोबत शुभ मंगल झाले. एका छोट्याश्या मधुचंद्राच्या ब्रेकनंतर दोघेही आपापल्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र होणार आहेत. विकीच्या सॅम बहादूरचे चित्रीकरण जोरात सुरू होणार असून आरएसव्हीपी आणि मेघना गुलजारच्या या चित्रपटात आणखी दोन कलाकारांची एन्ट्री झाली आहे. फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​या 'दंगल' मधील बहिणी यात आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

माणेकशॉ यांची लष्करी कारकीर्द चार दशके आणि पाच युद्धांची होती. फील्ड मार्शल पदावर पदोन्नती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात भारतीय लष्कराचा निर्णायक विजय लष्करप्रमुख म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. विशेष म्हणजे या वर्षी १९७१ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली.

भारताच्या महान युद्ध नायकांपैकी एक असलेल्या सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित या चित्रपटातील कलाकारांबाबतची ही महत्त्वपूर्ण घोषणा दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली आहे.

मुख्य नायक सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा विक्की कौशल साकारणार असून सान्या मल्होत्रा ​​त्यांची पत्नी सिल्लूची भूमिका साकारणार आहे ज्या माणेकशॉ यांच्या पाठी नेहमी खंबीरपणे उभ्या राहत. त्या त्यांच्या आधारस्तंभ आणि शक्ती होत्या. फातिमा सना शेख देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा - Ankita Lokhande Mehandi : अंकिता लोखंडेच्या हातावर विकी जैनच्या नावाची मेंहदी

सॅम बहादूर चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शिका मेघना गुलजार म्हणाली, "सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख 'सॅम बहादूर'च्या टीममध्ये सामील होत आहेत, हे खूप रोमांचक आहे. माझ्याकडे साजरे करण्यासारखे खूप काही आहे. १९७१ च्या युद्धात आपल्या लष्कराला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याचा अभिमान आहे. चित्रपटातील या दोन्ही भूमिकांमध्ये खूप संवेदनशीलता, सन्मान आणि संयम आवश्यक आहे आणि या पात्रांना जिवंत करणाऱ्या महिलांसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे."

सान्या आणि फातिमा यांच्या सॅम बहादूर सोबत जुळण्याबद्दल विकी कौशल म्हणाला, “मी सान्या आणि फातिमा या दोघींचेही माणेकशॉ कुटुंबात स्वागत करतो आणि आमच्या पिढीतील दोन अत्यंत प्रतिभावान आणि मेहनती अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करण्यास उत्सुक आहे. त्या त्यांच्या पात्रांसह सॅम बहादूरच्या कथेत अधिक महत्त्व आणतात आणि त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करताना मी खूप उत्साहित आहे. त्यांची पात्रे ही आपण ऐकलेली सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे आहेत आणि आता प्रेक्षक त्यांच्या शौर्याची आणि वचनबद्धतेची कथा पाहतील.”

सान्या मल्होत्रा ​​म्हणाली, “ही भूमिका साकारताना आणि या युद्धनायकाचा त्याच्या जीवनातील अविभाज्य भाग आणि प्रभाव समोर आणण्याचा मला सन्मान वाटतो. प्रत्येक महान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि सॅम बहादूरचा तो आधार आणि ताकद सिल्लू माणेकशॉ होती. मी मेघना गुलजारची देखील खूप आभारी आहे आणि तिच्यासोबतच्या या रोमांचक प्रवासाची मी खरोखरच वाट पाहत आहे."

फातिमा सना शेख पुढे सांगते, “मला अशी भूमिका इतक्या लवकर साकारायला मिळेल अशी अपेक्षा नव्हती. परंतु श्रीमती इंदिरा गांधी यांची भूमिका साकारायला मिळतेय याचा मला प्रचंड आनंद आणि अभिमान आहे. सॅम बहादूर कुटुंबात सामील होऊन आणि भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि ख्यातनाम महिलांपैकी एक असलेली भूमिका बजावण्याचे आव्हान स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाद्वारे निर्माते ज्या स्मृती आणि वारशाचा सन्मान करू इच्छितात त्या मागची उत्कटता मला सर्वात जास्त उत्साही वाटते."

रॉनी स्क्रूवाला निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित, या चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख यांच्यासह विकी कौशल 'सॅम बहादूर' यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा - लग्नाचे नवीन फोटो शेअर करीत कॅटरिनाने लिहिली बहिणींसाठी इमोशनल पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.