मुंबई - बॉलिवूड अभिनेता विक्की कौशलची केविड १९टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आपल्या टेस्टच्या नवीन निदानाबद्दल शुक्रवारी विकीने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
विकीने आपले हेल्थ अपडेट इंस्टाग्रामवर फोटोसह शेअर केले आहे. एक हसरा फोटो पोस्ट करीत त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने निगेटिव्ह इतकेच लिहिले आहे
त्याच्या आजारपणाच्या काळात ज्या हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या, प्रार्थना केल्या त्या सर्वांचे आभार विकीने मानले आहेत. "आज माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तुमच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि संदेश दिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांसाठी माझी प्रार्थना, सुरक्षित रहा!" असे विकीने लिहिले आहे. .
![Vicky Kaushal](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11426803_p.jpg)
विकीने ५ एप्रिलला कोविड -१९ची केलेली टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याने ही गोष्ट इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून सर्वांना कळवली होती. त्या दरम्यान भूमी पेडणेकरलाही कोरोनाची बाधा झाली होती. दोघेही शशांक खेतानच्या आगामी 'मि. लेले' चित्रपटाचे मुंबईत शूटिंग करत होते. विक्की बरा झाला आहे, भूमीचा अहवाल अजून आलेला नाही.
हेही वाचा - मनोरंजनसृष्टीला अत्यावश्यक सेवा म्हणून मानले जावे; IFTPC ची मागणी!