मुंबई - अभिनेता विकी कौशल सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलाय. उरी - द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यापूर्वी त्याच्या मसान आणि संजू चित्रपटातील भूमिकांचे कौतुक झाले होते. मात्र उरीमुळे तो अधिक गाजतोय.
The wait is finally over!
— Filmfare (@filmfare) February 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Catch @vickykaushal09 as candid as can be in the episode of #FamouslyFilmfare S2. @AmexIndia | @MyNykaa pic.twitter.com/enYFbwVAgk
">The wait is finally over!
— Filmfare (@filmfare) February 11, 2019
Catch @vickykaushal09 as candid as can be in the episode of #FamouslyFilmfare S2. @AmexIndia | @MyNykaa pic.twitter.com/enYFbwVAgkThe wait is finally over!
— Filmfare (@filmfare) February 11, 2019
Catch @vickykaushal09 as candid as can be in the episode of #FamouslyFilmfare S2. @AmexIndia | @MyNykaa pic.twitter.com/enYFbwVAgk
काही दिवसांपूर्वी तो ‘फेमसली फिल्मफेयर’ या शोच्या मंचावर आला होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर भाष्य केले. उरीनंतर त्याला भेटणारे फ्ॅन्स, त्यांच्या प्रतिक्रिया याबद्दल त्याने सांगितले. आपल्या प्रेयसीबद्दल घरच्यांची प्रतिक्रियाही त्याने रंजकपणे सांगितली.
आपला मुलगा कोण्यातरी मुलीच्या प्रेमात पडलाय याचा अंदाज विकीच्या आईला आला होता. एके दिवशी त्याने हिंमत करुन याबद्दल आईला सांगितले. कामावरुन तो जेव्हा घरी परतला तेव्हा आई आणि वडील त्याची वाट पाहात होते. त्याला याचे गांभीर्य लक्षात आले. वडिलांनी त्याला बोलावले आणि त्या मुलीविषयी विचारले. त्याने पुन्हा सविस्तरपणे आईला सांगितलेली गोष्ट सांगितली. वडील इतकेच म्हणाले, की तुझे वय आहे. ठीक आहे, आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्या मुलीचा नीट आदर कर.
या मुलाखतीत त्याने अनेक रंजक गोष्टींचा उलगडा केला आहे. फिल्मफेरच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ सेअर करण्यात आलाय. सविस्तर चर्चा तुम्ही पाहू शकता.