ETV Bharat / sitara

चांगली बातमी.. अमिताभ बच्चन यांची कोरोनावर यशस्वी मात; रुग्णालयातून डिस्चार्ज - अमिताभ बच्चन बातमी

तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. ते आता घरी आराम करतील. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद', अशा शब्दांत अभिषेक बच्चन यांनी लोकांचे आभार मानले आहेत.

अमिताभ बच्चन यांची कोरोनावर यशस्वी मात; रुग्णालयातून डिस्चार्ज

author img

By

Published : Aug 2, 2020, 5:12 PM IST

Updated : Aug 2, 2020, 6:19 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. अभिषेक बच्चन यांनी टि्वट करत ही माहिती दिली आहे.

'माझ्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. ते आता घरी आराम करतील. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद', अशा शब्दांत अभिषेक बच्चन यांनी लोकांचे आभार मानले आहेत.

अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना ११ जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हापासून दोघेही मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत होते. ऐश्वर्या रॉय, आराध्या, अमिताभ हे रुग्णालयातून घरी परतले आहेत. मात्र, अभिषेक बच्चन यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

13 जुलै रोजी बिग बी अमिताभ बच्चन याना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याना मुंबईतील नानावटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्यानंतर मुलगा अभिषेक, पत्नी जया, सून ऐश्वर्या, नात आराध्या यांचीही कोविड टेस्ट घेण्यात आली. त्यात अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह तर जया यांची कोविड चाचणी निगेटिव्ह अली होती. त्यानंतर अभिषेक आणि अमिताभ यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू झाले तर ऐश्वर्या आणि आराध्या घरीच क्वारंटईन झाल्या होत्या. मात्र, दोन दिवसांनी त्यांनादेखील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर 25 जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्या यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र बिग बी आणि अभिषेक यांच्यावर उपचार सुरूच होते. अखेर आज बिग बींची पुन्हा कोविड चाचणी घेण्यात आली ती निगेटिव्ह निघाल्याने त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ट्विट अभिषेक यांनी केले आहे.

असा चुकवला मीडियाचा ससेमिरा -

अमिताभ यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, मीडियाचा ससेमिरा चुकवण्यासाठी बिग बी यांनी अनोखी शक्कल लढवली. घरी येण्यासाठी आपल्या आलिशान गाडीऐवजी त्यांनी रुग्णवाहिकेमधून जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रुग्णालयातून दररोज अनेक रुग्णवाहिका बाहेर निघत असल्याने मीडियाचे त्याकडे दुर्लक्ष झाले. थेट ही रुग्णवाहिका जेव्हा जलसा या बिग बींच्या घराजवळ पोहोचली तेव्हा माध्यमांना बंगल्यापाशी रुग्णवाहिका कशी, अशी शंका आली. त्यावेळी या रुग्णवाहिकेत बिग बी असल्याचा उलगडा मीडियाला झाला, तर कॅमेरा आणि फोटोग्राफर यांचा कोणताही त्रास सहन न करता बिग बी सुखरूप घरी पोहोचले.

Last Updated : Aug 2, 2020, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.