मुंबई - 'एबीसीडी' आणि 'एबीसीडी २' या चित्रपटांना मिळालेल्या धमाकेदार यशानंतर याचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्ट्रीट डान्सर' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून पहिल्या शेड्यूलचं चित्रीकरण पूर्ण झाले आहे.
आता चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलला सुरूवात झाली असून वरूणने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. या फोटोत वरूण जीममध्ये डंबेल्ससोबत पोज देत आहे. त्याचा हा फोटो पाहता वरूण सध्या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं दिसत आहे.
![varun dhawan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3326074_varun.jpg)
नुकतंच या चित्रपटाचं पंजाबमधील चित्रीकरण पूर्ण झालं आहे. या चित्रपटात वरूणसोबत श्रद्धा कपूर झळकणार असून तीदेखील अनेकदा डान्सचा सराव करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.