वरुण धवन आगामी 'कुली नंबर १' मध्ये हमालाची भूमिका करताना दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग बँकॉकमध्ये सुरू आहे. वरुणने एक व्हिडिओ शेअर केला असून यात तो मजा मस्ती करताना दिसत आहे.
या व्हिडिओत वरुण सांगतो की तो साऊथ चीनच्या समुद्रात शूटींग करीत आहे. या चित्रपटात आपले नाव कुंवर महेंद्र प्रताप असल्याचेही तो सांगतो. त्यानंतर तो आपल्या बोटातील अंगठी दाखवतो व या नकली असल्याचेही सांगतो. या व्हिडिओत तो बऱ्याच फेका फेकी करताना दिसतो.
या व्हिडिओत तो बोटीला लटकतो. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, "कुंवर महेंद्र प्रताप. समुद्राच्या मधोमध जवळपास पडलाच होता.''
- View this post on Instagram
KUWAR MAHENDRA PRATAP. In the middle of the ocean nearly fell off 🌊 🏊♂️ #coolieno1
">
वरुण धवनचा हा 'कुली नंबर १' चित्रपट १९९५ मध्ये आलेल्या गोविंदाच्या चित्रपटाचा रिमेक आहे. यात गोविंदा आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत होते.
डेव्हिड धवन आपल्या लाडक्या लेकाला घेऊन हा चित्रपट पुन्हा बनवित आहेत. काही दिवसापूर्वी याचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले होते.
'कुली नंबर 1' चित्रपटात पहिल्यांदाच सारा आणि वरुण धवन यांची जोडी पाहायला मिळेल. १ मे २०१० ला हा सिनेमा रिलीज होईल.