मुंबई - दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाणी कपूर चंदीगडला रवाना झाली आहे. या चित्रपटामध्ये ती आयुष्मान खुरानासोबत काम करीत आहे.
वाणीने अलिकडेच अक्षय कुमारसोबत 'बेलबॉटम' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. अभिषेक कपूरसोबत काम करण्यासाठी ती उत्सुक झाली आहे. अभिषेक यांनी काइ पो छे, रॉक ऑन आणि केदारनाथ सारखे गाजलेले चित्रपट बनवले आहेत.
''हा एक ह्रदस्पर्शी चित्रपट आहे. मी नेहमीच अभिषेक कपूरसोबत काम करण्याची इच्छा बाळगून होते. त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी चालून आली आहे.'', असे वाणी म्हणाली.
या चित्रपटात तिची पहिल्यांदाच आयुष्मान खुरानासोबत काम करीत आहे. तो देशातील प्रतिभावान कलाकार असल्याचे वाणीने म्हटलंय.
वाणी पुढे म्हणाली, "आयुष्मान हा आमच्या पिढीतील सर्वात प्रतिभावान अभिनेता आहे आणि ही त्याच्यासोबत माझा पहिलाच चित्रपट सुंदर प्रेमकतेचा आहे याचा मला आनंद होतोय.''
या आगामी चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे.