ETV Bharat / sitara

कोणी घेतला असेल, 'माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा, म्हणून हिच्यावर होता माझा डोळा', हा उखाणा - रामदास आठवलेंचा उखाणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमा आठवले या झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर कार्यक्रमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या कार्यक्रमात आठवले यांनी घेतलेला उखाणा सर्वांच्याच लक्षात राहाणारा ठरला आहे. हा कार्यक्रम १२ आणि १३ नोव्हेंबरला दाखवला जाणार आहे.

Union Minister Ramdas Athawale and his wife Seema Athawale participate in Zee Marathi Home Minister program
झी मराठीच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सीमा आठवलेंचा सहभाग
author img

By

Published : Nov 12, 2021, 7:47 AM IST

Updated : Nov 12, 2021, 8:40 AM IST

मुंबई -‘होम मिनिस्टर’ (Home Minister) हा कार्यक्रम गेली १७ वर्ष महाराष्ट्रातील तमाम वहिनींचा महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी देऊन सन्मान आणि कौतूक करतोय. कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणारा 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आणि महाराष्ट्रातील तमाम वहिनींचा आवडता आहे.

सध्या दिवाळी विशेष भागांमध्ये काही खास पाहुणे या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. असंच एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व आणि त्यांची पत्नी 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (Republican Party of India (A) आणि केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister of Social Justice and Empowerment of India Ramdas Athawale) आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा आठवले (Seema Athawale) होम मिनिस्टर या कार्यक्रमात सहभागी होणार असून हा विशेष भाग लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

रामदास आठवले आले, की त्यांनी चारोळी सादर करणं अपेक्षीतच आहे. तसेच आठवलेंना छोट्या आणि खुमासदार कविता करण्याचा छंदच आहे, हे देखील सगळ्यांना ठाऊक आहे. शीघ्रकवी असलेल्या रामदास आठवले यांनी असाच एक मजेदार उखाणा कार्यक्रमात घेतला. आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) भाऊजींनी लग्नाची तारीख विचारली असताना आठवले यांनी त्यांच्या खास चिरपरिचीत अंदाजात उखाणा घेतला, 'माझ्या लग्नाची तारीख आहे सोळा, म्हणून हिच्यावर होता माझा डोळा'. त्यांचा हा मजेदार उखाणा ऐकून बांदेकरांसोबत सगळेच हसून लोटपोट झाले.

‘होम मिनिस्टर’ चा हा विशेष भाग प्रदर्शित होणार आहे १२ आणि १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता झी मराठीवर.

Last Updated : Nov 12, 2021, 8:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.