मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन स्टार टायगर श्रॉफ चाहत्यांशी संवाद साधत असतानात्याला सोशल मीडियावर लग्नाचा प्रस्ताव आला. दिशा पाटनीला डेट करत असलेल्या या टायगरने हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला नाही तर ब्रिटनमध्ये जाऊन तिच्याशी लग्न करावे असे म्हणणाऱ्या त्या मुलीला त्याने विनम्र प्रतिक्रिया दिली.
![Tiger Shroff](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9853882_p.jpg)
टायगरचे देखणे रुप आणि हेझल हिरव्या डोळ्यांमुळे, त्याला महिला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम मिळते. त्याच्या इन्स्टाग्रामचा कमेंट विभाग अनेक लग्नाच्या प्रस्तावांनी भरलेला आहे. परंतु अलीकडे जेव्हा त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सत्र आयोजित केलं तेव्हा युकेच्या एका चाहतीने तिच्याशी लग्न करण्यास सांगितले आणि त्याला टायगरनेही उत्तरही दिलं.
टायगर श्रॉफला फॅनने घातली लग्नाची मागणी
प्रश्नोत्तराच्या काळात टायगर श्रॉफला एका चाहतीकडून गोड विवाहाचा प्रस्ताव मिळाला परंतु यावर त्याने दिलेल्या उत्तरामुळे त्याने सोशल मीडियावरील चाहत्यांचे हृदय जिंकले. एका युजरने त्याला लिहिले, "माझ्याशी लग्न कर. यूकेला ये." यावर अभिनेताने उत्तर दिले की, "कदाचित काही वर्षांत, मी तुला पाठिंबा देऊ शकेन ... तोपर्यंत शिकण्यासाठी आणि कमवण्यासाठी खूप काही आहे."
हेही वाचा - वाढदिवस विशेष : जेजुरीचा 'खंडोबा' आहे रजनीकांतचे कुलदैवत
टायगरचे आगामी चित्रपट
लवकरच ‘बागी 4’ या अॅक्शन चित्रपटाच्या कामाला तो सुरूवात करणार आहे. त्याबरोबरच तो ‘हिरोपंती’ चित्रपटाच्या सीक्वेलचेही काम सुरू करणार आहे. पिरोपंती २ हा त्याचा लॉकडाऊननंतर रिलीज होणारा पहिला चित्रपट असेल.
हेही वाचा - कुणाल खेमूने बॉलिवूडमध्ये पूर्ण केली १५ वर्षे