मुंबई - भारतात सर्वात जास्त कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आणि त्यातही सर्वाधिक संख्या मुंबई शहरात आहे. त्यामुळे तुलनेने इथे अधिक काळजी घेण्याची गरज आहे. असे असले तरी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर फिरायला येणाऱ्यांची संख्या रोज वाढताना दिसते. अशातच बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान मुलाबाळांसह इथे फिरताना आढळला. विशेष म्हणजे त्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे आणि इतर नियम नपाळल्याचा ठपका सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. त्याने फिरताना मास्क न वापरल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. खरेतर सैफ, करिना आणि तैमुर तिघांनीही मास्क घातले होते. मात्र एका फोटोत तो विना मास्क दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सैफ अलीवर अनेक ट्रेलर्स आपला निशाणा साधत आहेत. एका युजरने म्हटलंय, बॉलिवूडवाल्यांना मास्कपेक्षा गॉगल लावणे जास्त सुरक्षित वाटते. दुसऱ्या युजरने म्हटलंय, की सेलिब्रेटीजना कोरोना होत नाही असा समज सैफचा झालाय. आणखी एका युजरने मास्क न लावल्याबद्दल टीका केलीय. त्याने सैफला बेजबाबदार म्हटलंय. तर एकाने अशा लोकांच्यामुळेच मुंबईत कोरोना वाढत असल्याचे म्हटलंय.
सैफ अली खान करिना आणि मुलगा तैमुरसह मरीन ड्राईव्हवर फिरायला आला होता. यावेळचे त्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर ट्रोलर्सची गँग तुटुन पडली. समुद्र किनारी फिरण्यासाठी मुंबई प्रशासनाने परवानगी दिली आहे. परंतु काही नियमही घातले आहेत. यात मुले आणि वयोवृध्द नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळणे बंधनकारक आहे. मात्र हे सर्व नियम सैफ आणि करिनाने गुंडाळून ठेवल्याचे ट्रेलर्सचे म्हणणे आहे.