मुंबई - बहुप्रतीक्षित लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. मनोरंजक, हॉरर कॉमेडी असलेला ट्रेलर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारा आहे. ३ मिनिटे आणि ४० सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार याने स्क्रीनला अक्षरशः झपाटून टाकले आहे. या ट्रेलरमध्ये जितके सीन्स आहेत त्यातील प्रत्येक सीनमध्ये अक्षय कुमार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाहायला मिळतो. बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
लक्ष्मी बॉम्ब चित्रपट दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. भारतात हॉटस्टारवर हा सिनेमा रीलिज होईल. ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, यूएई येथे थिएटरमध्ये ९ नोव्हेंबरलाच हा सिनेमा रिलीज केला जाईल. तर, हॉटस्टारवर अमेरिका, युके, कॅनडामध्ये पाहता येणार आहे.
लक्ष्मी बॉम्ब हा हॉरर-कॉमेडी चित्रपट हा २०११ च्या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे आणि या सिनेमाचे दिग्दर्शन राघवा लॉरेन्स यांनी केले आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे थिएटर्स बंद आहेत. म्हणून लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट आता डिस्ने+हॉटस्टारवर डिजिटल स्ट्रिमिंग होणार आहे. हा चित्रपट अक्षयचा पहिला डिजिटल रिलीज असेल.