मुंबई- लॉकडाऊनंतर अनेकांची लग्ने होताना दिसत आहेत. बऱ्याच सेलिब्रिटींचे हात पिवळे झाले आहेत. कोरोना कालखंडातील आतापर्यंतचे मोठे लग्न म्हणजे वरुण धवन आणि नताशा दलालचा विवाह. लग्नादरम्यान आत जाऊन फोट काढता आले नाही, मात्र लग्नस्थळी फोटोग्राफर्सची झुंबड उडाली होती. ते लग्नसमांरभासाठी उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींना कव्हर करत होते. लग्न लागल्यावर वरुणने या फोटोग्राफर्ससाठी लाडू पाठवले. तसेच काही वेळाने नवदाम्पत्य हातात हात घालून स्वतः मीडियासमोर आले व हात हलवून अभिवादन केले. यावेळी वरुणने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला शेरवानी घातला होता, तर नताशाने स्वत:च डिझाईन केलेला घागरा-चोली घातली होती.
वरुणला करायचे होते युरोपमध्ये लग्न
खरंतर वरुण धवनने आपले लग्न युरोपातील एका नयनरम्य देशात करण्याचे ठरविले होते, व ठिकाणही निवडून ठेवले होते. परंतु कोरोनामुळे विदेशात जाण्यासाठी अडचन निर्माण झाली. वरुणने आपल्या लग्नासाठी तब्बल वर्षभर वाट पाहिली, मात्र अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही असल्याने, अखेर त्याने आपल्याच देशात लग्न करण्याचा निर्णय घेतला. व आज अलिबागमधील एका भव्य रिसॉर्टमध्ये वरुण-नताशाचे शुभमंगल झाले. खरंतर त्याने २६ जानेवारीला मुंबईत रिसेप्शन ठेवण्याचे ठरविले होते, परंतु दोन्ही कुटुंबीयांनी ते नंतर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच वरुण आपली पत्नी नताशासोबत २६ला अलिबागवरून स्पीडबोटने मुंबईत परतला. वरुणला पाहाण्यासाठी त्याच्या फॅन्सने गर्दी केली होती. यावेळी मांडवा जेट्टीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.