ETV Bharat / sitara

विचार करतोय पोहत घरी जावं, मुंबईच्या पावसानं 'टायगर'ही हैराण

टायगरनं सोशल मीडिया अकाऊंटवरून आपला एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये टायगरनं म्हटलं, विचार करतोय, की आज पोहतचच घरी जावं.

मुंबईच्या पावसानं टायगरही हैराण
author img

By

Published : Aug 4, 2019, 8:18 AM IST

मुंबई - मुंबईत शनिवारपासून पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे, नागरिक या पावसानं हैराण झालेले असतानाच, आता टायगरनंही मुंबईच्या पावसावर प्रतिक्रिया देणारी पोस्ट शेअर केली आहे.

टायगरनं सोशल मीडिया अकाऊंटवरून आपला एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये टायगरनं म्हटलंय, विचार करतोय, की आज पोहतचच घरी जावं. शनिवारी दिवसभर सुरू असणाऱ्या संततधार पावसाने मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं होतं. ज्यामुळे वाहतुकीमध्येही अडथळा निर्माण झाला होता. इतकचं नाही तर काही विमानांचं उड्डाणही रद्द करण्यात आलं होतं.

दरम्यान टायगरशिवाय अभिनेत्री ईशा कोपिकरनेही मुंबईच्या पावसावर पोस्ट शेअर केली आहे. ढगांच्या गरजण्याचा आवाज वाढतो, तेव्हा मला खूप आनंद होतो. कारण, यानंतर अजून पाऊस होणार याची कल्पना येते. पावसाचा प्रत्येक थेंब एखाद्या भेटवस्तूसारखा वाटतो....कारण तो आहेच, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.