ETV Bharat / sitara

टायगर श्रॉफच्या 'गणपथ'चा टिझर रिलीज, जबरदस्त अ‌ॅक्शनची प्रतीक्षा

author img

By

Published : Nov 5, 2020, 7:06 PM IST

अभिनेता टायगर श्रॉफने आपल्या आगामी 'गणपथ' या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. हा टिझर पाहिल्यापासून चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

'Ganapath' teaser release
'गणपथ'चा टिझर रिलीज,

मुंबई : टायगर श्रॉफने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ''गणपथ' या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये टायगर श्रॉफची स्टाईल त्याच्या चाहत्यांना आवडली आहे. हा टिझर पाहिल्यापासून चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. विकास बहल यांनी 'गणपथ' दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती वशु भगनानी, विकास बहल, दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी करत आहेत.२०२१मध्ये ''गणपथ'चे शूटिंग सुरू होईल आणि २०२२पर्यंत प्रदर्शित होईल.

फिल्म ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. 'गणपथ' या चित्रपटात टायगर श्रॉफची नायिका कोण राहिली याचा अद्याप खुलासा झालेला नाही. या चित्रपटाचा फक्त मुख्य अभिनेता समोर आला आहे. टायगर श्रॉफला जबरदस्त बॉडी पाहून चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन पाहायला मिळेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. टायगर श्रॉफच्या 'बागी 4' या चित्रपटाचीही घोषणा झाली आहे. 'बागी 4'चे शूटिंग डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली. इतकेच नाही तर टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2'चे शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे. टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलताना आपल्याला बर्‍याच अ‍ॅक्शन्स पाहायला मिळतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.