मुंबई -विश्वसुंदरी मानुषी छिल्लर यशराज प्रॉडक्शनच्या ‘पृथ्वीराज’ मधून अक्षय कुमारची नायिका म्हणून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. अभिनयासोबतच ती जागतिक समस्यांवर व्यक्त होत असते. जागतिक संस्थांसोबत अनेक उपक्रमांमध्येही ती सहभागी होत असते. बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज असलेली मानुषी छिल्लर वसुंधरा दिन (अर्थ डे) साजरा करताना सांगतेय की शाकाहारी असण्याने आपल्या पृथ्वीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा - हिंदी आणि गुजराती मनोरंजनसृष्टीतील अभिनेता अमित मिस्त्री यांचे अकाली निधन!
मांसमुक्त बनण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहन
मानुषी ‘पेटा’ म्हणजेच पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्स संस्थेसोबतही काम करते. पेटा आता मानुषीसोबत एक राष्ट्रीय स्तरावरील मोहीम राबवत आहे. यात ती ब्रोकोली, शतावरी आणि टोमॅटो या भाज्यांनी बनलेला मुकुट घालून शाकाहारी बनण्यासंदर्भात संदेश दिला आहे. मानुषी म्हणाली, "शाकाहारी असणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. अनेक वर्षांपूर्वी मी हा निर्णय घेतलाय. माझ्या एकूण फिटनेसवर काय परिणाम होतो, हे मला पहायचे होते." तसेच, "अन्न ही वैयक्तिक आवडनिवड आहे आणि आपल्याला स्वत:साठी काय योग्य वाटतं तेच आपण खायला हवं. पण पेटा इंडियामधील माझा मित्रपरिवार आणि मी प्रत्येकालाच यंदाच्या अर्थ डेला आणि त्यांना वाटल्यास त्यानंतरही मांसमुक्त बनण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देणार असल्याचेही मानुषी म्हणाली.
हेही वाचा - बेस्ट कामगारांचे सदस्य नोंदणी अभियान स्थगित करा; भाजपाची मागणी
६९ कोटी लोक आजही उपाशी
इतकेच नाही, प्राण्यांच्या शेतीसाठी जगातील एक तृतीयांश पाणी वापरलेृ जाते. जगभरातील शेतजमिनीतील एक तृतीयांश भाग वापरला जातो. पाण्याच्या टंचाईमुळे पृथ्वीवर आताच मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाण्याची अत्यंत टंचाई असलेल्या देशांमध्ये दोन अब्जांहून अधिक लोक राहतात आणि ६९ कोटी लोक आजही उपाशी असल्याचेही मानुषी म्हणाली. युनायटेड नेशन्सच्या फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या मते प्राण्यांच्या शेतीचा म्हणजे आहारासाठी त्यांची वाढ, पैदास, कत्तल या प्रक्रियांचा जागतिक ग्रीन हाऊस उत्सर्जनात १४.५ टक्के वाटा आहे. जगातील सर्व वाहतूक व्यवस्था एकत्रित जितका परिणाम करते त्याहून हे अधिक असल्याचे ती म्हणाली.