ETV Bharat / sitara

बॉक्स ऑफिसला कोरोनाचा फटका, ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह राहणार बंद - कोरोना विषाणू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही मुख्य शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जीम, जलतरण तलाव इत्यांदी ठिकाणे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Theater Shutdown In Maharashtra due to Corona Virus
बॉक्स ऑफिसला कोरोनाचा फटका, ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह राहणार बंद
author img

By

Published : Mar 14, 2020, 11:30 PM IST

मुंबई - जगभरात वेगाने पसरणारा कोरोना विषाणू भारतात येऊन ठेपला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनामुळे उद्योगधंद्यांवरही परिणाम दिसू लागले आहेत. तसेच, बॉक्स ऑफिसलाही याचा चांगलाच फटका बसला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही मुख्य शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जीम, जलतरण तलाव इत्यांदी ठिकाणे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासोबतच तेलंगना सरकारनेही सिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर याचा परिणाम दिसत आहे.

  • Yash Raj Films #YRF informs... "Given the #CoronaVirus [#COVID19] outbreak in the country, we have decided to postpone the release of Dibakar Banerjee’s #SandeepAurPinkyFaraar. The health and safety of everyone is of utmost importance at this time."

    — taran adarsh (@taran_adarsh) March 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • As a precautionary measure against spread of #CoronaVirus, State govt has decided that all schools, colleges, coaching centres, gymnasium, movie theatres & theatre halls will remain closed till 30th March. The move will not impact ongoing examinations in schools and colleges.

    — Ashok Gehlot (@ashokgehlot51) March 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अभिनेता इरफान खानचा 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट १३ मार्चला प्रदर्शित झाला. मात्र, पहिल्याच दिवशी या चित्रपटाची कमाई फक्त ४.०३ कोटी इतकी झाली आहे. या चित्रपटातून इरफान खान बऱयाच वर्षानंतर पडद्यावर झळकला आहे. मात्र, काही ठिकाणी चित्रपट गृह बंद असल्याने या चित्रपटाला फटका बसला आहे.

दुसरीकडे सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला 'विजेता'. विक्रम गोखले आणि अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेला 'एबी आणि सीडी' या चित्रपटांनाही कोरोनामुळे फटका बसला आहे.

कोरोनाची दहशत पाहता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित 'सूर्यवंशी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली आहे. याची नवी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. तर, अभिनेता अर्जून कपूर आणि अभिनेत्री परिणीती चोप्राचा 'संदीप और पिंकी फरार' हा चित्रपटही पुढे ढकलण्यात आला आहे.

अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी 'जर्सी' चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आली आहे. चंदीगढ येथे या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. मात्र, आता शूटिंग थांबल्याने संपूर्ण टीम मुंबईला परतली आहे.

रणवीर सिंगचा 'जयेशभाई जोरदार', फरहान अख्तरचा 'तुफान' आणि विकी कौशलचा 'सरदार उधम सिंग' या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

  • राज्यात कोरोना विषाणूच्या बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असून पुणे, पिंपरी चिंचवड येथील शाळा बंद ठेवणार. १० व १२ वी परीक्षा सुरू राहतील. याशिवाय आज मध्यरात्रीपासून मुंबई, पुणे, नागपूरव ठाण्यातील जिम, स्विमिंग पूलसह नाट्यगृहे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.#CoronaVirusUpdate pic.twitter.com/TDHO4kPPCW

    — Rajesh Tope (@rajeshtope11) March 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.