मुंबई - भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांचा मृत्यु गुढ झाल्याचा मतप्रवाह आहे. पाकिस्तानसोबत झालेल्या युध्दानंतर शास्त्री यांची लोकप्रियता वाढली होती. पाकिस्तानमध्ये लष्कराने घुसून विजय मिळवला होता. त्यानंतर शास्त्रीजी रशियाच्या दौऱ्यावर गेले. तिथेच त्यांचा मृत्यु झाला होता.
रशियाच्या दौऱ्यावर असताना ताश्कंदमध्ये लालबहाद्दुर शास्त्री यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामागे कोणते गुढ आहे हे शोधण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अतुल अग्निहोत्री यांनी 'द ताश्कंद फाईल्स' मधून केलाय.
या सिनेमात मिथुन च्क्रवर्ती, नसिरुद्दीन शाह, श्वेता बसू, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी, अंकुर राठी आणि प्रकाश बेलावडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
'द ताश्कंद फाईल्स' हा चित्रपट १२ एप्रिलला रिलीज होत आहे.