ETV Bharat / sitara

'द लायन किंग'नं पार केलं शतक, इतकी केली कमाई - कमाईचे आकडे

चित्रपटाने ९ दिवसात म्हणजेच शनिवारपर्यंत ९८.४८ कोटींची कमाई केली. तर दहाव्या दिवशी म्हणजेच रविवार या सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केला असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे.

'द लायन किंग'नं पार केलं शतक
author img

By

Published : Jul 29, 2019, 7:58 AM IST

मुंबई - हॉलिवूडच्या 'द लायन किंग' चित्रपटाचा रिमेक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. हिंदी, तेलुगू, तमिळसह इंग्रजीतही हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आता शतक गाठलं आहे.

चित्रपटाने ९ दिवसात म्हणजेच शनिवारपर्यंत ९८.४८ कोटींची कमाई केली. तर दहाव्या दिवशी म्हणजेच रविवार या सिनेमाने १०० कोटींचा आकडा पार केला असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. मात्र, रविवारच्या कमाईचे आकडे अद्याप समोर आले नाहीत.

चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनमध्ये किंग खान शाहरुखने यातील मुख्य पात्र 'मुफासा'ला आवाज दिला आहे. तर, त्याचा मुलगा आर्यनने 'सिंबा' या पात्राला आवाज दिला आहे. संगणक अॅनिमेटेड म्यूझिकल असलेला हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर आपली जादू आणखी किती दिवस टिकवून ठेवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.