मुंबई - ‘स्टुडंट् ऑफ द इयर’ मध्ये निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन या तीन नवोदितांना लाँच केले होते. चित्रपट सुपरहिट झाला होता व तिघेही रातोरात स्टार्स बनले. या तिघांनाही करणने आपल्या पंखाखाली घेतले ते आजतागायत. सिद्धार्थ मल्होत्राला अगणित फ्लॉपस देऊनही मोठ्या बॅनरचे चित्रपट आजही मिळताहेत यापाठी करण जोहरचं ‘पाठबळ’ असल्याचे बॉलीवूडच्या कान्याकोपऱ्यात बोलले जाते. त्यांच्यासोबत ‘एसओसिटी’ करत असल्यापासूनच करणने तर आलियाला मुलगी व वरुणला मुलगा मानले हे सर्वश्रुत आहेच. याच मानलेल्या मुलाला म्हणजेच वरुण धवनला, बोहल्यावर चढलेला बघून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचे पाहायला मिळाले.
करण जोहरच्या डोळ्यात तराराले आनंदाश्रू! करण जोहरने भावना व्यक्त केल्याकरण जोहरने एक भावनिक पोस्ट लिहिली ज्यात त्याने, स्वैरानुवादानुसार, म्हटले आहे की, 'ही पोस्ट लिहिताना माझ्या भावना डबडबलेल्या आहेत आणि अनेक आठवणी उजागर होत आहेत. मला अजूनही आठवते याला लहानपणी गोव्यात पाहिलेले, एक लांब केस वाढवलेला, डोळ्यात असंख्य स्वप्न भरलेला, अंगात व चालीत ठासून ‘स्वॅग‘ भरलेला मुलगा, ज्याला पडद्यावर मॅजिक करण्याची इच्छा दिसत होती. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे खरेच आहे. काही वर्षांनी हाच मुलगा ‘माय नेम इज खान‘ च्या वेळी माझा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला. त्याच्या नकळत मी त्याचे निरीक्षण करु लागलो. त्याची कामाप्रती दृढ निष्ठा व हसता खेळता स्वभाव सर्वांचीच मनं जिंकत होता. मला अजूनही त्याने माझ्या पिक्चरसाठी पहिल्या शॉटवेळी कॅमेरा फेस केला तो क्षण आठवतोय. मला आपसूकच त्याच्याबद्दल प्रेम आणि काळजीची भावना दाटून आली. जसे काही माझा मुलगाच तो क्षण जगतोय असे वाटून गेले. आज त्याला जेव्हा आपल्या प्रेयसीसोबत अग्निफेरे घेताना पाहिले तेव्हा खरंच वाटले की 'माझा' मुलगा मोठा झाला आहे आणि त्याच्या आयुष्याच्या सुंदर टप्प्यासाठी सज्ज आहे. माझे प्रिय, नताशा आणि वरुण, यांचे प्रेमपूर्वक अभिनंदन. माझे आशीर्वाद आणि प्रेम कायम तुमच्या सोबत असेल.'वरुणने हिंदू परंपरेनुसार लग्न केले. हळद, मेंदी, संगीत याबरोबरच तरुणांना प्रिय असलेली बॅचलर्स पार्टी सुद्धा केली.
हेही वाचा - पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…