ETV Bharat / sitara

'रश्मी रॉकेट'साठी तापसी पन्नू घेतेय कठोर प्रशिक्षण, नवीन फोटो केले शेअर - 'रश्मी रॉकेट'मध्ये तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नूने 'रश्मी रॉकेट' या चित्रपटाच्या प्रशिक्षणामधील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या सिनेमासाठी ती खूप कष्ट घेत असून त्याचे फोटो ती नेहमी चाहत्यांसाठी शेअर करीत असते.

Taapsee Pannu
अभिनेत्री तापसी पन्नू
author img

By

Published : Dec 18, 2020, 1:16 PM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नू आगामी 'रश्मी रॉकेट' या चित्रपटात अॅथिलेटची भूमिका साकारत आहे. यासाठी गेली काही महिने ती कठोर परिश्रम करीत असल्याचे दिसते. आता तिने प्रशिक्षणादरम्यान मेहनत करीत असल्याचा फोटो पोस्ट केला आहे.

तापसीने दोन फोटो शेअर केले आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "५० एलबीएस (२२.६किलो) ते ५४०एलबीएस (२४४.९ किलो) उचलण्यापासून तिचा प्रवास शेअर केला आहे."

Taapsee Pannu shares new pictures
तापसीने शेअर केला प्रशिक्षणाचा फोटो

रश्मी रॉकेट' या चित्रपटाची कथा नंदा परियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकर्ष खुराना करणार आहेत.

हेही वाचा -अवघ्या दोन महिन्याच्या लग्नानंतर, नेहा कक्करने केली प्रेग्नेंसीची घोषणा?

अभिनेत्री तापसी पन्नू हिची भूमिका असलेल्या 'रश्मी रॉकेट' चित्रपटाची कथा एका गावातील मुलीची आहे. वेगात धावण्यासाठी ईश्वराने तिला वरदान दिले आहे. या अतुलनीय क्षमतेमुळे गावकरी तिला रॉकेटच्या नावाने ओळखतात. जेव्हा तिला व्यावसायिकपणे आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते तेव्हा ती ही संधी तिच्या हातातून जाऊ देत नाही. फिनीश लाईनपर्यंत धावण्यात अनेक अडथळे आहेत, याची तिला जाणीव होते. अ‍ॅथलेटिक स्पर्धेसारखी दिसणारी ही शर्यत, सन्मान, आदर आणि अगदी स्वतःच्या ओळखीसाठी वैयक्तिक लढाईत रुपांतरित होते.

हेही वाचा -उर्मिला मातोंडकरांना इन्स्टाग्राम उकाऊंट पुन्हा बहाल, काही पोस्ट अद्यापही गहाळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.