ETV Bharat / sitara

VIDEO: तापसी म्हणतीये, दादीयो का स्वागत नहीं करोगे?

उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावात राहणाऱ्या ८६ वर्षीय चंद्रो तोमर आणि ८१ वर्षांची त्यांची नणंद प्रकाशी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असणार आहे. या चित्रपटाचा टीझर गुरूवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सांड की आँखची खास झलक
author img

By

Published : Jul 10, 2019, 7:21 PM IST

मुंबई - अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या आगामी 'सांड की आँख' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. यानंतर आता एक व्हिडिओ शेअर करत दादीयो का स्वागत नहीं करोगे? असा सवाल तापसीनं केला आहे.

उत्तर प्रदेशमधल्या जोहरी गावात राहणाऱ्या ८६ वर्षीय चंद्रो तोमर आणि ८१ वर्षांची त्यांची नणंद प्रकाशी यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असणार आहे. या दोघींनाही 'रिव्हॉल्वर दादी’ म्हणून ओळखलं जातं. विविध स्पर्धांमध्ये या दोघींनी ७००हून अधिक पदकं जिंकली आहे. चित्रपटात भूमी आणि तापसी प्रकाशी आणि चंदो तोमर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाचा टीझर गुरूवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सांड की आँख’ या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप आणि निधी परमारने केली आहे. तर तुषार हिरानंदानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या दिवळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.