ETV Bharat / sitara

टीव्ही अभिनेत्री ट्रोल का होतात, तापसी पन्नूचा खोचक सवाल - टीव्ही अभिनेत्री ट्रोल का होतात

अभिनेत्रींनी बिकीनीतील फोटो शेअर केले तर त्यांना शिवीगाळ करणारे मात्र जेव्हा पुरुष कलाकार जीममधील किंवा बीचवरील अर्धनग्न फोटो शेअर करतात तेव्हा काहीच बोलत नाहीत. समजात महिलांना समानता नसल्याचेच हे निरीक्षण असल्याचे अभिनेत्री तापसी पन्नूने म्हटले आहे.

Taapsee Pannu
तापसी पन्नू
author img

By

Published : Mar 27, 2021, 7:33 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने आपला फोटो शेअर करताना भाष्य केलंय की, टीव्ही अभिनेत्री जेव्हा स्वीमवेअरमधील फोटो शेअर करतात तेव्हा त्यांच्यावर टीका का केली जाते.

हिंदी चित्रपटसृष्टीत लैंगिक समानता पाळली जात नसल्याचे मत तापसीने व्यक्त केलंय. थप्पड या चित्रपटाला १७ फिल्मफेअर नामांकने यावर्षी मिळाली होती हे समाजात पुरुष स्त्रीशी कसे वागतात याचे प्रतिबिंब होते. तापसीचे आगामी चित्रपटदेखील सर्व महिलाकेंद्रित आहेत आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा समाजातील पुरुषांपेक्षा स्त्रियांशी कसे वागवले जाते याबद्दल ती बोलते तेव्हा ते वक्तव्य बातम्यांचे मथळे बनतात.

टीव्ही कलाकार जेव्हा स्वीमसूटमध्ये फोटो काढतात त्यांच्या रोष का व्यक्त केला जातो असे विचारले असता तापसी म्हणाली, '' जेव्हा महिला बिकीनीतील फोटो शेअर करतात तेव्हा त्यांना शिवीगाळ केली जात परंतु त्याच वेळी जेव्हा पुरुष जीममधील किंवा बीचवरील अर्धनग्न फोटो शेअर करतात तेव्हा त्यांना कोणीही काहीही म्हणत नाही, असे सामान्यपणे माझे असे निरीक्षण आहे.''

कामाचा विचार करता तापसीने हसीन दिलरुबा, रश्मी रॉकेट, लूप लपेटा आणि दोबारा या चार चित्रपटांचे शुटिंग पूर्ण केले आहे.

हेही वाचा - 'रँचो'नंतर 'व्हायरस'ने 'फरहानला'ही गाठले, आर माधवन 'थ्री इडियट्स'चा संदर्भ देत खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.