मुंबई -' सांड की आँख' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करताच तापसी पन्नू आपल्या आगामी सिनेमासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं 'थप्पड' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. आता या चित्रपटत अभिनेता पवैल गुलाटीचीदेखील एन्ट्री झाली आहे.
तापसीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दलची माहिती दिली आहे. 'थप्पड' सिनेमाचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा करत आहेत. तापसीनं पवैल आणि अनुभव यांच्यासोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. 'असं म्हटलं जातं, की तुमचा बेटर हाफ तुमची बेटर बाजू समोर आणतो. मिस्टर विक्रम सबरवाल इन द हाऊस आणि पवैल गुलाटी, फक्त इतकंच म्हणेल, की अखेर..! काफी पुराना उधार हैं', असं कॅप्शन तापसीनं पोस्टला दिलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
तिच्या या पोस्टवरुन पवैल यात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. पवैलनंही हाच फोटो शेअर करत म्हटलं, 'यासाठी तर माझं धन्यवाद म्हणणंही पुरेसं नसेल, अनुभव सिन्हा आणि तापसी आभारी आहे. यासोबतच अनुराग कश्यप तुम्ही माझी लाईफलाईन आहात'. दरम्यान थप्पड सिनेमा ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे.