ETV Bharat / sitara

सावधान : शूटर आणि रिव्हॉल्वर आज्जी दिवाळीत धडकणार तुमच्या शहरात - Revover Dadi

शूटर दादी आणि रिव्हॉल्वर दादी म्हणून प्रसिध्द असलेल्या वयोवृध्द नेमबाज आज्जींच्या जीवनावरील सत्यकथा पडद्यावर साकारली जाणार आहे. सांड की आँख या आगामी चित्रपटाची झलक असलेले एक छायाचित्र प्रसिध्द करण्यात आलंय.

सांड की आँख
author img

By

Published : Aug 29, 2019, 1:16 PM IST

मुंबई - खेळ दिनाच्या निमित्ताने तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. 'सांड की आँख' या आगामी चित्रपटात्या सेटवरील हे दृश्य आहे. तुषार हिरानंदानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. वयाच्या साठीनंतर हातात रिव्हॉल्वर घेऊन अचूक निशाणा साधणाऱ्या शूटर दादींची ही सत्य कथा आहे. भूमी पेडणेकर चंद्रो तर तापसी पन्नू प्रकाशीच्या भूमिकेत दिसणार आहे.

वय वर्षे ८६ असणाऱ्या चंद्रो तोमर ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून गावात प्रसिद्ध आहेत. त्यांचं नेमबाजीचं कौशल्य पाहिलं की भलेभले तोंडात बोट टाकून त्यांच्याकडे बघत बसतात. आजींनी नेमबाजीच्या २५ राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांत १०० हून अधिक पदकं जिंकली आहेत.

दुसऱ्या आजींच नाव आहे प्रकाशी तोमर. या चंद्रो तोमर यांच्या नणंद आहेत आणि यांचंही वय ८२ आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी जेव्हा त्यांनी रिव्हॉल्वर शूटींगला सुरूवात केली तेव्हा अनेकांनी तिची खिल्ली उडवली. मात्र सगळ्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी आपला निशाणा साधला आणि सगळ्या जागाचे लक्ष वेधून घेतले.

अशा या जिगरबाज आज्जींची अफलातून गोष्ट आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.