मुंबई - कोरोना व्हायरसनंतर आलेल्या काम बंदच्या संकटामुळे प्रवासी मजुर आपल्या घरी परतण्यासाठी हतबल झाले आहेत. गावी परतण्यासाठी सरकारकडे मजुर मदतीची अपेक्षा करीत आहेत. याच काळात अभिनेता सोनू सूद अशा मजुरांच्या मदतीसाठी धावून आलाय. त्याच प्रमाणे मदत करणाऱ्या या लोकांच्या यादीत नवे नाव सामील झाले आहे, ते म्हणेजे अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे.
स्वरा भास्करने घराबाहेर पडून प्रवासी मजुरांची मदत करायला सुरुवात केली आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, 'प्रवाशी मजुर आपल्या घरी परतण्यासाठी तळमळत आहेत आणि मी घरी आरामात बसली आहे, हे सर्व पाहून मला लाज वाटली. या अपराधी भावनेतून मी घराच्या बाहेर पडले आणि प्रवाशी मजुरांची मदत केली.'
-
Pls send their names and contact details . https://t.co/gK2Iblykdh
— Swara Bhasker (@ReallySwara) May 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pls send their names and contact details . https://t.co/gK2Iblykdh
— Swara Bhasker (@ReallySwara) May 28, 2020Pls send their names and contact details . https://t.co/gK2Iblykdh
— Swara Bhasker (@ReallySwara) May 28, 2020
मिळालेल्या माहितीनुसार स्वरा भास्कर प्रवासी मजुरांच्या मदतीसाठी सक्रिय झाली आहे. यातील जास्त मजूर हे उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत. स्वराने आतापर्यंत १५०० मजुरांनी त्यांच्या घरी पाठवले आहे.
खरंतर लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद खरा हिरो ठरला आहे. त्याने अलिकडेच केरळमध्ये अडकलेल्या १६९ मुलींना विमानाने ओडिशाला पाठवले होते. अमिताभ बच्चन यांनीही उत्तर प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी हाजी अलीहून बस सेवा उपलब्ध केली होती.