ETV Bharat / sitara

वाढदिवस साजरा न केल्याबद्दल इरफान खानला अखेर सुतापा सिकदरने केले 'माफ' - सुतपाने इरफानला माफ केले

सुतापा सिकदर यांनी यावर्षी त्यांचा वाढदिवस मुलगा बाबील आणि अयानसह साजरा केला. इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या दिवंगत पतीची आठवण करीत एक भावनिक नोट लिहिली आहे.

इरफान खानची पत्नी सुतपा सिकदर
इरफान खानची पत्नी सुतपा सिकदर
author img

By

Published : Jan 25, 2022, 1:13 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - दिवंगत अभिनेता इरफान खानने वाढदिवस लक्षात ठेवण्यावर किंवा साजरा करण्यावर फार विश्वास ठेवला नाही, परंतु त्यांची पत्नी सुतापा यांनी आपला वाढदिवस बहुतेक वेळा विसरल्याबद्दल अखेरीस इरफानला माफ केले आहे.

सुतापा सिकदर यांनी यावर्षी त्यांचा वाढदिवस मुलगा बाबील आणि अयानसह साजरा केला. इंस्टाग्राम हँडलवर त्यांच्या दिवंगत पतीची आठवण करीत एक भावनिक नोट लिहिली आहे.

सुतपा यांनी आपल्या पोस्टमध्ये इरफान खानच्या वाढदिवस विसरण्याच्या सवयीबद्दल लिहिले आहे. सहजीवनातील ३२ वर्षांपैकी २८ वाढदिवस तो विसरला होता. वाढदिवसाच्या आदल्या रात्री सुतपा सिकदर अस्वस्थ असायच्या. या आठवणी जागवताना त्यांनी लिहिलंय की वाढदिवस साजरा न करण्याची इरफानची फिलॉसॉफी तिने आता स्वीकारली आहे.

वाढदिवस साजरा करणे म्हणजे त्याच्यासोबत वेळ घालवणे अशी कल्पना सुतपा यांची होती. मात्र आपला वाढदिवस बाबील आणि अयान विसरला नसल्याचेही सुतपा यांनी लिहिले आहे. त्यांच्या स्वप्नात इरफान येऊन त्यानेच ही कुजबुज केली का अशी गोड शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी अखेर म्हटलंय की वाढदिवस साजरा केला नसला तरी इरफानने दिलेले प्रेम मात्र सुतपा विसरु शकलेल्या नाहीत. याबद्दल त्यांनी इरफानला चीयर्स केले आहे.

इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरचे निदान झाले होते. या दुर्धर आजाराशी तो निकराने लढला. मात्र त्याची ही लढाई 29 एप्रिल 2020 रोजी संपली होती.

हेही वाचा - सिध्दांत चतुर्वेदीने प्रसंगावधान राखत अनन्याला केलेल्या मदतीमुळे चाहते फिदा, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.