ETV Bharat / sitara

ह्रतिकची पत्नी सुझान खानने शेअर केला लॉकडाऊनमधील प्रेमाचा अनुभव - ह्रतिक

ह्रतिकची पत्नी सुझान खान लॉकडाऊननंतर मुलांसह घरी परतली आहे. गेली काही दिवस अत्यंत प्रेमाने ते एकत्र राहात आहेत. याकाळातील काही अनुभव तिने एका मुलाखतीत सांगितले आहेत.

Sussanne Khan share experience of Hritik
ह्रतिकची पत्नी सुझान खान
author img

By

Published : May 14, 2020, 6:27 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रार्दुर्भाव रोखण्यासाठी सुरू झालेल्या लॉकडाऊननंतर हृतिक रोशन आणि त्याची घटस्फोटित पत्नी सुझान पुन्हा एकत्र आले आहेत. ती मुलांसह हृतिकच्या घरी परतली होती. त्यानंतर दोघांच्यामधील संबंध चांगले सुधारत असल्याचे चित्र आहे. हृतिक नेहमी सुझानचे कौतुक करीत असतो. काही दिवसापूर्वी त्याने एक व्हिडिओ शेअर करुन सुझानविषयी लिहिले होते.

सुझानने आता हृतिकच्या घरी परतल्यानंतरचा आपला अनुभव शेअर केला आहे. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत तिने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय. तिने आपल्या पॉझिटिव्ह गोष्टींवर मुलाखतीत भर दिला. तिने ही मुलाखत आपल्या इन्स्टाग्रामवर शेअरदेखील केली आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ''घराच्या चार भिंतीच्या आत जे तुम्ही कराल तेच तुमचे सर्वश्रेष्ठ काम समजले जाईल.''

ती मुलाखतीत म्हणाली, ''जेव्हा लॉकडाऊनची घोषणा झाली होती तेव्हाच मी आणि हृतिकने ठरवले होते, की याकाळात आपण मुलांसोबत असणे आवश्यक आहे. तेव्हाच आम्ही ठरवले होते की आपण घरीच राहूयात. प्रेमाने आम्ही लॉकडाऊनची सुरूवात केली.''

सुझानला तिच्या या मुलाखतीनंतर खूप पाठिंबा मिळत आहे. याबद्दलच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

सुझानने आपल्या मुलाखतीत संदेश देताना म्हटले, ''आपल्या सर्वांसाठी हा वेकअप कॉल आहे. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यासाठी आपले बॉन्डिंग शेअर करा. सुंदर आठवणी तयार करण्यासाठी वेळ द्या.''

हृतिक आणि सुझानचा विवाह २०००मध्ये झाला होता. १३ वर्षे सुखाचा संसार केल्यानंतर त्यांच्यात बिनसले आहे ते २०१३मध्ये वेगळे झाले. २०१४मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. दरम्यान त्यांच्या मुलांमुळे त्यांचे एकत्र भेटणं पुन्हा सुरू झालंय. अनेकवेळा ते एकत्र डेटिंगही करताना दिसले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.