मुंबई - दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मैत्रीण अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्या फ्लॅटचा बँक हप्ता सुशांत भरत होता, अशा चर्चांना उधाण आल्यानंतर लगेचच अंकिताने यावर खुलासा केला आहे. तिने आपल्या बँकेचे स्टेटमेंट सोशल मीडियावर शेअर केले आणि दाखवून दिले की तिच्या घराचा हप्ता तिच्याच बँक खात्यातून भरला जातोय.
अंकिताने आपल्या ट्विटर अकाउंटवर जानेवारी २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत आपल्या बँकेच्या स्टेटमेंटची एक प्रत शेअर करताना लिहिले आहे की, "येथे मी सर्व तर्कांना खोडून काढते, शक्य तितक्या पारदर्शकपणे. माझ्या फ्लॅटची नोंदणी आणि त्याच्यासोबत माझ्या बँकेचे स्टेटमेंट्समधून (01/01/19 ते 01/03/20) दर महिन्याला माझ्या खात्यातून ईएमआय वजा केले जातात. मला जास्त काही सांगायचे नाही.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मालाड येथे अंकिता राहत असलेल्या फ्लॅटसाठी ४.५ कोटींचे हप्ते सुशांत भरत होता, असा रिपोर्ट आल्यानंतर अंकिताचे हे ट्विट आले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अहवालात म्हटले आहे की, त्यांना ही माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) सूत्रांकडून मिळाली आहे. हा अहवाल शुक्रवारी संध्याकाळी समोर आला आणि अंकिताने ट्विट करून हा अहवाल फेटाळून लावला.
ईडीने शुक्रवारी सुशांतसिंह राजपूतच्या खासगी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यात त्याच्या नोकरांचाही समावेश होता. ईडीच्या उच्च अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एजन्सीने पंकज दुबे, रजत मेवती आणि दीपेश सावंत यांचे मनी लाँडरिंग प्रतिबंधक अधिनियम (पीएमएलए) २००२ अंतर्गत जवाब नोंदवले.