ETV Bharat / sitara

सुशांत आत्महत्या प्रकरण : पोलिसांनी नोंदवला मुकेश छाबडाचा जवाब

सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर पोलिसांनी त्याचा मित्र आणि प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडाचा जवाब दाखल करुन घेतला आहे. छाबडाने सुशांतच्या 'दिल बेचारा' या शेवटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Sushant and Mukesh
सुशांतसह मुकेश छाबडा
author img

By

Published : Jun 18, 2020, 5:01 PM IST

मुंबई - शहराचे डेप्यूटी कमिश्नर (डीसीपी) अभिषेक त्रिमुखे यांनी गुरुवारी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाच्या प्रकरणाबाबत मुकेश छाबडा यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे. छाबडा हा प्रसिद्ध कास्टिंग आणि फिल्म डिरेक्टर असून तो सुशांतचा जवळचा मित्रही मानला जातो.

आपले स्टेटमेंट रोकॉर्ड करत असताना मुकेश छाबडाने सांगितले, की सुशांत चांगला अभिनेता होता आणि दिग्दर्शक म्हणून त्याच्याशी नातेही चांगले होते. छाबडाने सुशांतच्या 'दिल बेचारा' या शेवटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ८ मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, लॉकडाऊनमुळे याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. यापूर्वी सोमवारी छाबडाने सुशांतबद्दल एक भावूक पोस्ट लिहिली होती. यात त्याने 'इंडस्ट्रीने एक अनमोल दागिना हरवल्याचे' म्हटले होते.

हेही वाचा - सुशांत सिंहच्या अस्थींचे शोकाकूल वातावरणात झाले गंगेमध्ये विसर्जन...

सुशांतच्या कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले आहे. दरम्यान, सुशांतसिंहच्या आत्महत्येला जबाबदार ठरवून एकता कपूर, सलमान खान आणि करण जोहरसह ८ बॉलिवूड सेलेब्रिटीजवर मुजफ्फर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने १४ जानेवारीला वांद्रे येथील घरी फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येने बॉलिवूडला हादरा बसला होता. १५ मे रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार पार पडले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.