ETV Bharat / sitara

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवावी - मायावती

author img

By

Published : Jul 30, 2020, 1:32 PM IST

बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती म्हणाल्या की सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी दररोज होणाऱ्या नवीन तथ्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी केली पाहिजे. गुरुवारी त्यांनी ट्विट करुन ही मागणी केली आहे.

Mayawati
मायावती

लखनऊ - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची चौकशी केंद्रीय ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) ने दररोज होणाऱ्या नवीन तथ्यांच्या पार्श्वभूमीवर केली पाहिजे, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी गुरुवारी केली.

"बिहारमधील रहिवासी असलेला युवा बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. नवीन बाबी उघडकीस आल्या आहेत. तसेच त्याच्या वडिलांनी पाटणा पोलिसात एफआयआर नोंदवली आहे. आता या प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र आणि बिहार पोलिसांपेक्षा सीबीआयने करणे अधिक चांगले, असे बसपाच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • 1. बिहार मूल के युवा बालीवुड अभिनेता सुशान्त सिंह राजपूत की मौत का मामला रोज नए तथ्यों के उजागर होने व उनके पिता द्वारा पटना पुलिस में एफआईआर दर्ज कराने से लगातार गहराता जा रहा है। अब मामले की जाँच महाराष्ट्र व बिहार पुलिस द्वारा होने से बेहतर है कि प्रकरण की जाँच सीबीआई ही करे।

    — Mayawati (@Mayawati) July 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या प्रकरणात त्यांच्या स्वार्थासाठी कॉंग्रेस राजकारणात गुंतल्याबद्दल मायावतींनीही हल्लाबोल केला आणि महाराष्ट्र सरकारला या प्रकरणाबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याचे आवाहन केले.

"तसेच, सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील महाराष्ट्र आणि बिहारमधील कॉंग्रेस नेत्यांची वेगळी वृत्ती स्पष्ट करते की, त्यांचे वास्तविक हेतू प्रथम त्यांचे राजकीय हित साधणे आणि नंतर पीडितेच्या कुटुंबाला न्याय प्रदान करणे हे आहे. हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकारने गंभीर असले पाहिजे , " असे त्या म्हणाल्या.

  • 2. साथ ही, सुशान्त राजपूत प्रकरण में महाराष्ट्र व बिहार के काग्रेंसी नेताओं के अलग-अलग रवैये से ऐसे लगता है कि इनका असल मकसद इस प्रकारण की आड़ में पहले अपने राजनीतिक स्वार्थ की पूर्ति करना है तथा पीड़ित परिवार को न्याय दिलाना बाद में, जो कतई उचित नहीं। महाराष्ट्र सरकार गंभीर हो।

हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्ती पोहोचली सर्वोच्च न्यायालयात

तत्पूर्वी, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत आहे आणि हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्याविरोधात मंगळवारी सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार बिहार पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली असून सुशांतशी संबंधित अनेकांची ते चौकशी करणार आहेत.

सुशांतसिंह राजपूत 14 जूनला मुंबईच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू आत्महत्या केल्याने झाल्याची नोंद आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या तपासात चित्रपटनिर्माते महेश भट्ट, चित्रपट समीक्षक राजीव मसंद, दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी, आणि चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांच्यासह ४१ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.